वरखेडी ते कुऱ्हाड रस्त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न आमदार गिरीश महाजनांचेच (जगदीश तेली कुऱ्हाड)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२१
जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार आमदारांच्या श्रेय वादाच्या भोवऱ्यात, वरखेडी कुऱ्हाड रस्ता गेला खड्यात या मथाळ्याखाली सत्यजीत न्यूजला बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या बातमीची दखल घेत आमदार व जिल्हापरिषद सदस्यांनी वरखेडी ते कुऱ्हाड रस्त्याची दिलेली निवेदने ही बनवाबनवी असून या रस्त्यासाठी जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांनी सगळ्यात अगोदर निधी उपलब्ध होऊन त्वरित काम सुरु करण्यासाठी निधी मंजूर केला होता. व नंतर इतरांनी मंत्री महोदयांना पत्रव्यवहार केला असेलही परंतु यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केला हे खोटे असल्याचे कुऱ्हाड येथील भाजपचे कार्यकर्ते जगदीश तेली यांनी सांगितले व तसा पुरावा दिलेला आहे.
परंतु या राजकारणात सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. तरी राजकारण बाजूला ठेवून यारस्त्याचे काम त्वरित सुरु करावे अशी मागणी पंचक्रोशीतील जनतेकडून होत आहे.