सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

राजकीय
Home›राजकीय›ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी द्या- अमोल शिंदे.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी द्या- अमोल शिंदे.

By Satyajeet News
December 29, 2020
584
0
Share:
Post Views: 282
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१२/२०२०
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी भरण्याची प्रक्रिया ऑफलाइन करावी, अशी मागणी भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. यामुळे राज्यभरातुन लाखो उमेदवार नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पुढे सरसावले आहेत. मात्र ऑनलाइन नामनिर्देशन प्रक्रिया प्रचंड संथ गतीने, किचकट तसेच वेळेचा अपव्यय करीत असल्याने लाखो इच्छुक उमेदवार निवडणूक प्रक्रियेपासुन वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करून राज्यभरातील ग्रामपंचायत उमेदवारांची नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन करावी अशी मागणी पाचोरा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.
ग्रामपातळीवरील लोकशाहीचे आद्य केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत मध्ये उमेदवारी करून आपल्या नेतृतवाचे पंख विस्तारण्यासाठी सरसावलेल्या लाखो उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर (साईटवर) नाव नामनिर्देशन पत्रांसाठी एकच गर्दी केलेली आहे. परिणामी शासनाच्या या निवडणूक पोर्टलवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक व ताण निर्माण झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. वारंवार अडचण येत असल्याने एकच अर्ज पुन्हा पुन्हा भरावा लागत आहे. या ऑनलाइन प्रक्रियेत वेळेचा अपव्यय होत असून उमेदवारांना रात्री – बेरात्री, उशिरापर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तातकळत बसावे लागत आहे. युवा उमेदवारांना सोबतच ज्येष्ठ नागरिक व महिला उमेदवारांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. सदरची ऑनलाइन प्रक्रिया अशाच पद्धतीने त्रासदायक, किचकट व संथ गतीने सुरु राहिली तर अनेक इच्छुक उमेदवार आपल्या लोकशाहीच्या हक्कापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ऑनलाइन पोर्टलच्या भवश्यावर राहिल्यामुळे मागील निवडणुकीत सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात ऑफलाइन उमेदवारी अर्ज भरण्याचा परवानगी देण्यात आली होती आणि त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पूर्वानुभव व या सर्व परिस्थितीचा तसेच संभाव्य धोक्याचा तातडीने विचार करून राज्यभरातील ग्रामपंचायत उमेदवारांना तातडीने विनाविलंब ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा द्यावी, अशी विनंती भारतीय जनता पार्टी चे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल पंडितराव शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. तसेच या विनंतीच्या प्रती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव, पाचोरा तहसिलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी पाचोरा यांच्याकडे पाठवल्या आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

रस्त्यावर चूल पेटवून भाजल्या भाकरी,गॅस दरवाढ विरोधात ...

Next Article

राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे प्राथमिक शिक्षिका मोनिका चौधरी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    पाचोऱ्याचे आमदार म्हणजे नौटंकीबाज माणूस-भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे.

    June 8, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींच्या चौकशी विरोधात पाचोरा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन.

    July 27, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    वडगाव आंबे खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलने परिवर्तन पॅनलचा उडवला धुव्वा.

    November 6, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत दाखल , रोहिणीताई खडसेंनीही बांधले हाती घड्याळ

    October 23, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    कासमपुरा ग्रामपंचायतीवर भाजपा चा झेंडा. सरपंचपदी श्री. सतीष (गवळी)राजपूत तर उपसरपंचपदी सौ. शितल शिंदे.

    February 14, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    प्रविण दरेकरांनी शेण खाल्लं’; पाचोऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन.

    September 15, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • माझा सिंधुदुर्ग

    २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवण मतदारसंघासाठी १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर

  • प्रासंगिक

    इस बात की कीस को फिक्र नहीं, की कल कबिले क्या होगा!!, सब इस बात पर लढ रहे हैं, की कबीले का अगला सरदार कौन होगा!!

  • ब्रेकिंग न्यूज

    शिंदाड येथे चुकीने इंजेक्शन दिल्यामुळे महिलेच्या हाताला झाले सेप्टिक, तडजोड झाली पण रुग्णांच्या जिवाचा प्रश्न ऐरणीवर.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज