उद्या भरणारा वरखेडी येथील आठवडी बाजार बंदचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०९/२०२३
दिनांक २८ सप्टेंबर २०२३ गुरुवार रोजी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला असल्याची जाहीर सुचना वरखेडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सविता ताई चंद्रकांत सोनवणे व ग्रामविस्तार अधिकारी मा. श्री. जी. के. नंन्नवरे यांनी सर्व व्यापाऱ्यांना दिली असून उद्या कुणीही वरखेडी बाजारात आपल्या व्यवसायाची दुकाने लावण्यासाठी येऊ नये व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे जाहीर केले आहे.
कारण उद्या दिनांक २८ सप्टेंबर २०२३ गुरुवार रोजी श्री. गणेशाचे विसर्जन व ईद ए मिलाद हे हिंदू, मुस्लिम बांधवांचे सण, उत्सव एकत्र येत आहेत. या दिवशी मिरवणूक काढून वाजत, गाजत श्री. गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त मुस्लिम बांधव एकमेकांच्या भेटी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित येणार असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी ८६२ (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक २८ सप्वटेंबर २०२३ गुरुवार व २० सप्टेंबर २०२३ शुक्रवार रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार भरवण्यास बंदी घातली असून आपापल्या गाव व पंचक्रोशीतील जनतेच्या सोयीनुसार इतर दिवशी आठवडी बाजार भरवण्यात यावेत असा आदेश पारित केला असल्याने जळगाव जिल्ह्यात वरील तारखेला गावागावात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. म्हणून आठवडी बाजारात येणाऱ्या व्यवसायिकांनी याची नोंद घेऊन शासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.