उद्या पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गणेश मंडळाच्या मीटिंचे आयोजन, गणेशभक्त अडचणीत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वरचे मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक गावातील पोलिस पाटील हे खालील मजकुर असलेला संदेश आपपल्या परिसरातील व्हाट्सएपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत तसेच गणेशभक्तांना माहिती व्हावी म्हणून पाठवत आहेत. परंतु हा संदेश पाहिल्यावर व वाचल्यानंतर गणेश मंडळ व गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.
यामागील कारण म्हणजे
उद्या दिनांक ०६ सप्टेंबर सोमवारी सकाळी वेळ १०.३० वाजता पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे श्री.गणेश मंडळ यांची मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. तसेच ज्या गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करायचा असेल त्या मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी मीटिंगमध्ये येतांना आपल्या गावातील ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला तसेच मंडळ बाबत आवश्यक ती माहिती सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. तसेच आपल्या गावातील तंटामुक्त अध्यक्ष, बँड व डीजे चे मालक यांनादेखील मीटिंगसाठी घेऊन यावे असे सूचीत केले आहे.
परंतु हा संदेश दिनांक ०५ रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पाठवला जात आहे. विशेष म्हणजे आज रविवार असल्याकारणाने कार्यालयीन सुट्टी आहे.तसेच उद्यि सकाळी ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला मिळणे शक्य नाही. कारण उद्या बैलपोळा असल्याकारणाने कार्यालयीन सुट्टी आहे. तसेच एका, एका ग्रामसेवकांना दोन ते तीन ग्रामपंचायतीच्या कारभाराची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याने कालच्या कालच सकाळी साडेदहा वाजेपर्यंत नाहरकत दाखला मिळणे शक्य नाही. कारण सद्यस्थितीत एकही ग्रामसेवक मुख्यालयाचे गावी रहात नसल्याने ते नियुक्त केलेल्या गावी दहा वाजेपर्यंत पोहचतात तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील व गणेश मंडळाचे सदस्य हे शेतकरी कुटुंबातील असल्याने पोळा सण साजरा करण्यात व्यस्त असतील या कारणांमुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त करत सत्यजीत न्यूजकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेऊन दिनांक ०८ सप्टेंबर बुधवार रोजी मीटिंगचे आयोजन करुन आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.