वरखेडी गुरांच्या बाजारातील बेवारस स्थितीत आढळलेल्या शेळ्यांचा तपास गुलदस्त्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२३
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील गुराढोरांच्या आठवडी बाजारात दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी काही शेळ्या (बकऱ्या) व बोकड बेवारस स्थितीत आढळून आले होते. बाजर संपल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी बेवारस आढळलेल्या शेळ्या व बोकडाच्या मालकाचा शोध घेतला असता त्याठिकाणी कोणीही आढळून आले नसल्याने या बेवारस शेळ्या व बोकड संबंधित मालकाचा शोध लागेपर्यंत मार्केट कमेटीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात सांभाळण्यासाठी दिल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
असे असले तरी या बेवारस आढळलेल्या शेळ्यांचा तपशील पोलीस स्टेशनला कळवून त्या सापडलेल्या शेळ्या व बोकडांची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसिध्दीस देणे गरजेचे होते व आहे कारण सापडलेल्या शेळ्या व बोकडांची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसिध्दीस देण्यात आली तर ज्या इसमाच्या शेळ्या असतील त्या इसमाला शेळ्या सापडल्याचे ज्ञात होईल व शेळ्या आपल्या मालकीच्या आहेत असे पुरावे देऊन संबंधित शेळी मालकाला त्या परत देता येतील व इकडेतिकडे शोधाशोध करणे थांबेल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता कुणीही समाधानकारक उत्तर देत नसून ही जबाबदारी आमची नसल्याचे सांगत एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याचे जाणवते आहे.