कुऱ्हाड जवळील उमर्दे शिवारता बिबट्याची दहशत कायम, शेती पडीत पडण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०८/२०२३

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथुन जवळच असलेल्या उमर्दे शिवारता मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून मागील आठवड्यात एका शेळीवर
हल्ला चढवून शेळी ठार मारली होती. हि घटना ताजी असतांनाच दिनांक ३१ जूलै २०२३ सोमवार ते ०१ ऑगस्ट २०२३ मंगळवार रात्रीचे दरम्यान कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी दगडू भगत यांच्या उमर्दे शिवारतील खळ्यातील (गुरांचा आखाड्यावर) बांधलेल्या शेळीवर हल्ला चढवून शेळीला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कुऱ्हाड येथुन जवळच असलेल्या उमर्दे शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार करण्याची मालिका सुरुच असल्याने या शेत शिवारातील शेतकऱ्यांमध्ये तसेच शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या मनात बिबट्या विषय भीती निर्माण झाली असल्याने शेतमजूर शेतात काम करण्यासाठी येत नसल्याने शेतातील निंदणी, खुरपणी, वखरणी, कोळपणी, पिकाला खत देणे तसेच जंतुनाशक फवारणीची कामे थांबली असल्याने शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करुन जिवापाड मेहनत करुन उगवलेले व वाढीस लावलेली पिके मशागतीअभावी हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून वनविभागाने कुऱ्हाड गावाजवळील उमर्दे शिवारात त्वरित सापळा लावून (पिंजरा) या बिबट्याला धरुन दुसरीकडे सोडण्यासाठी त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही आंदोलन करु असा इशारा कुऱ्हाड येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या