दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०९/२०२३

शासनाने बंदी घातलेल्या कॅरी बॅग, कप, प्लेट आणि स्टॉजसारख्या सर्व वस्तूंची विक्री व वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली असतांनाही पाचोरा शहरात या बंदी घातलेल्या वस्तूंची विक्री व खुलेआमपणे वापर केला जात असल्याचे दिसून येत असून यामुळे पाचोरा शहरात ठिकठिकाणी मोठमोठे उकिरडे तयार झाले असून सद्यस्थितीत पावसाळ्यात सगळीकडे दुर्गंधी पसरली असून पाचोरा शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत असुन पाचोरा शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे.

विशेष म्हणजे पाचोरा नगरपरिषदेवर जोपर्यंत लोकप्रतिनिधी सत्तेवर होते तोपर्यंत पाचोरा शहरातील नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात थोड्याफार प्रमाणात कॅरी बॅगचा वापर केला जात होता. मात्र जेव्हापासून पाचोरा नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु झाल्यापासून पाचोरा शहरात सर्वदूर कायद्याची पायमल्ली केली जात असल्यावर ही नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर या सर्वच बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहरवासीयांनी केला आहे.

आजच्या परिस्थितीत पाचोरा शहरात शासनाने बंदी घातलेल्या कॅरी बॅग, कप, प्लेट आणि स्टॉजसारख्या वस्तूंचा सर्रासपणे वापर केला जात असल्याने पाचोरा शहरातील हमरस्त्यावर, बाजारपेठेत तसेच गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत या कचऱ्याचे ढीग म्हणजे सगळीकडे शासनाने बंदी घातलेल्या कॅरी बॅग, कप, प्लेट आणि स्टॉजसारख्या वस्तूंचा खच पडलेला दिसून येत आहे. याच उकिरड्यावर अन्न शोधण्यासाठी कुत्रे, डुकरे व मोकाट गायी चरणांना दिसून येतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आहे. व या प्राण्यांच्या ठाण्यामध्ये प्लॅस्टिक येत असल्याने त्यांना पोटाचे (फॉरेन बॉडी) सारखे म्हणजे पोटफुगी सारखे विकार होऊन यात या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. म्हणून शासनाने बंदी घातलेल्या कॅरी बॅग, कप, प्लेट आणि स्टॉजसारख्या वस्तूंची विक्री करणाऱ्या ठोक विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.