गोंडगाव येथील स्व. कल्याणीला न्याय मिळवून देण्यासाठी शिंदाड येथे कडकडीत बंद व निषेध मार्चाचे आयोजन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२३
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील स्व. कल्याणी या बालवयातील मुलीवर एका नराधमाने अत्याचार करुन तीला जिवे ठार मरले या घटनेचा निषेध करुन या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी व निषेध नोंदवण्यासाठी परवा दिनांक १० ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी संपूर्ण शिंदाड गाव बंद ठेवण्याचा निर्णय शिंदाड येथील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
दिनांक १० ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता जिल्हापरिषद शाळा व समाज विकास विद्यालयातील शाळकरी मुलामुलींना सोबत घेत संपूर्ण शिंदाड गावातून निषेध रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत सगळ्यांनी सहभागी होऊन कल्याणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तसेच निषेध करण्यासाठी सगळ्यांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन शिंदाड ग्रामस्थांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.