पाचोरा येथे विकास पाटील व मित्रपरिवारा तर्फे भव्य रोजगार मेळावा.

दिलीप जैन(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२२
राजकारणासोबतच समाजकारण करत आजपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या तालुक्यात नवनवीन उपक्रम राबवून तरुणांसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. आजही हा प्रयत्न सतत सुरु आहे. कारण आजच्या परिस्थितीत नवीन पिढीला फक्त आणि फक्त झेंडे धरण्यासाठी किंवा दांडे काढण्यासाठी वापरले जाते असा अनुभव येत आहे. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीच हा हेतू डोळ्यासमोर न ठेवता नवतरुण, सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठीचे धोरण राबवून तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करुन पोटापाण्याला लावण्याचा प्रयत्न केला आहे.
अश्याच एका प्रयत्नातून १८ ते ३० वर्षे वयोगटातील युवक व युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी येत्या २४ जानेवारी २०२२ सोमवार रोजी सकाळी ९ वाजता पाचोरा शहरातील कृष्णापुरी शंभो नगर येथील श्री.विठ्ठल मंदिराजवळ भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यात जास्तीत जास्त युवक, युवतींनी उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा असे अवाहन मेळाव्याचे आयोजक पाचोरा नगरीचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर मित्रपरिवारातर्फे करण्यात आलेले आहे.
या भव्य रोजगार मेळाव्यात बँकिंग क्षेत्रातील सर्व रोजगाराच्या सुवर्ण संधी उपलब्ध असून यात SBI, HDFC, KOTAK, BANDHAN, AXIS, BARODA, ICICI, YESBANK, PAY-TM,RBL व इतर नामांकित बॅंका मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असून १० वी १२ वी सर्व शाखेतील पदवी पदव्युत्तर तसेच (MBA) व इतर शाखा यांच्यातर्फे मार्गदर्शन व मुलाखती घेतल्या जाणार असून अनुभवी व उत्तम उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.
म्हणून युवक व युवतींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्याव असे अवाहन आयोजकांनी केले आहे.