इस बात की कीस को फिक्र नहीं, की कल कबिले क्या होगा!!, सब इस बात पर लढ रहे हैं, की कबीले का अगला सरदार कौन होगा!!
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२३
आपल्या देशात आज जरी लोकशाही असली तरी मात्र मागील पंधरा वर्षांपासून घराणेशाही सुरु झाली असल्याचे जाणवते आहे. याबाबत बोलायचे झाले तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत वारंवार तेच, तेच चेहरे मात्र पत्र्येक पंचवार्षिक निवडणुकीत पक्ष बदलून, बदलून तमाशाच्या फडातील कलाकारासारखे जिकडे स्वताचा फायदा तिकडे निवडणूक लढविण्यासाठी तयार असतात. तसेच बाप एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात तर घरातील महिला इतर सदस्य तिसऱ्या पक्षात व उरलेसुरले अपक्ष म्हणून राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
या स्वार्थी वृत्तीमुळे गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे वाटोळे झाले तरी चालेल पण स्वताचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही राजकीय मंडळी काम, दाम, दंड, भेद हे सगळे डावपेच वापरुन सतत सत्तेत राहण्यासाठी धडपड करत आहेत. विशेष म्हणजे मागील काळात राजकीय चढाओढीत फक्त तत्वांचे वाद असायचे कारण त्या काळात जनहितार्थ निवडणूक लढवून दिन, दलित, गोरगरिबांच्या भल्यासाठी ते राजकारणात प्रवेश करत होते. परंतु आता स्वहितासाठी ठेकेदार, उद्योगपती, जनतेच्या नावावर विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत मलिदा खाण्यासाठी राजकीय खेळी खेळली जात आहे.
असाच काहीसा प्रकार सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील घेण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिसून येत आहे. याबाबत उघड, उघड रोखठोकपणे बोलायचे झाले तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागील काही वर्षांपासून घराणेशाही सुरु झाली असून तेव्हापासून गावातील भाऊबंदकी, समाजा, समाजाचे गट, तट निर्माण करुन तर काही ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण, गुंडगिरी, तालुका, जिल्हा व राज्यातील लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन दबावतंत्र वापरुन निवडणुका घेतल्या जात आहेत.
यामागील कारण म्हणजे एकदाका सत्ता हातात आली म्हणजे निवडून आलेले पदाधिकारी हे गाव विकासाच्या योजना आणून त्या माध्यमातून एक तर स्वता किंवा नातेवाईकांना हाताशी धरुन या विकासाच्या योजना राबवतांना स्वताहाचे फायद्यासाठी ठेका घेऊन लाखो रुपयांची योजना फक्त हजारो रुपयात राबवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याने आजही जवळपास ८०% गावांचा विकास झालेला नाही. यामागील कारण शोधून काढले असता शासनाच्या विविध योजना यात वैयक्तिक शौचालय, घरकुल, इंदिरा आवास योजना, रस्ते, शाळा, सांडपाण्याच्या गटारी, अंगणवाडी इमारत, पाणीपुरवठा योजना व इतर गाव विकासाच्या योजनांच्या माध्यमातून हजारो, लाखो रुपये कमीशन खातात.
यामुळे गावांचा विकास खुंटला असून गावाच्या समस्या आहे तश्याच आहेत मात्र गावातील राजकारणात सक्रिय होऊन स्धताचा विकास करुन घेण्यासाठी काम, दाम, दंड, भेद व सत्तेचा गैरवापर करुन घेत सगळीकडे धडपड सुरु असून पिढ्यानपिढ्या बसून खाता येईल इतकी मालमत्ता कमावली असल्याचे दिसून येते यामुळे गरीब, श्रीमंतीची दरी वाढत चालली आहे. हि परिस्थिती पाहता
(इस बात की कीस को फिक्र नहीं, की कल कबिले क्या होगा!!, सब इस बात पर लढ रहे हैं, की कबीले का अगला सरदार कौन होगा!!) असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही असे म्हटले जाते.