निसर्गमित्र जळगाव तर्फे १५ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन फुलपाखरु प्रश्न मंजुषा.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०९/२०२३
सद्यस्थितीत एकाबाजूला भौगोलिक प्रगती होत असतांनाच दुसरीकडे निसर्गसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. तसेच नवनवीन शोध लागल्यामुळे आपल्या या कृषिप्रधान देशात जास्त उत्पादन घेण्याच्या नादात नैसर्गिक, जैविक व सेंद्रिय शेती करण्याचा कल कमी होत चालला असून रासायनिक शेतीचे वाढते प्रमाण होत असल्याने शेतमालावर वेगवेगळ्या जंतुनाशक फवारण्या, रासायनिक खते वापरली जात असल्याने निसर्गाच्या सानिध्यात असलेले चिमणी, पाखरं बरेचसे पक्षी, लहान, लहान कीटक (मित्र कीटक), फुलपाखरु नष्ट झाली आहेत. तर काही पक्षी व किटकांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यात भावी पिढीला पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरु हे चित्रातून दाखवून ओळख करुन द्यावी लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याचीच दाखल घेऊन निसर्गमित्र जळगाव तर्फे एक छोटासा उपक्रम हाती घेण्यात आला असून यात बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर २०२३ निमित्त १५ ते ३० या सप्टेंबर कालावधीत ऑनलाईन ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ आयोजित करण्यात आली असून आज या लिंकचे प्रसारण करण्यात आले आहे. फुलपाखरू संवर्धन व जतन होण्यासाठी विविध प्रयत्न होणे गरजेचे असल्याकारणाने त्या दृष्टीकोनातून ऑनलाईन ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सत्यजित न्यूज कडे दिली आहे.
विशेष म्हणजे भारतात ०५ सप्टेंबर २०२० पासून संपूर्ण सप्टेंबर महिना हा महा फुलपाखरु महिना म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. करण फुलपाखरे ही उत्तम ‘बायो इंडिकेटर’ समजली जातात. त्यांचे जतन व संवर्धन होणे ही तातडीची गरज आहे. त्यासाठी प्रथम फुलपाखरांचे जीवनचक्र समजून घेणे गरजेचे आहे.
यासाठी निसर्गमित्र जळगाव तर्फे आज १५ सप्टेंबररोजी ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ प्रसारीत करीत असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले.
प्रश्नमंजुषा ही मराठी व इंग्रजीत सोडवता येणार आहे. प्रश्नमंजुषा १५ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सोडवता येईल त्या नंतर सहभाग प्रमाणपत्र पाठवण्यात येणार नाही. सर्व वयोगटातील पर्यावरण प्रेमी नागरिक बंधू,भगिनींनी आपला थोडासा वेळ काढून या उपक्रमात सहभागी व्हावे व ही प्रश्नमंजुषेची लिंक आपल्या मित्र,मैत्रीणी व स्नेहींना पाठवावी व फुलपाखरु महिना साजरा करण्यात सहभागी व्हावे असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.
९४२३९७३११५
[टीप– आपल्या ईमेलवर आपणास सहभागाचे प्रमाणपत्र पाठवण्यात येईल. तरी योग्य ईमेल द्यावा ]
निर्मिती :-शिल्पा व राजेंद्र गाडगीळ -निसर्गमित्र ,जळगाव,माहिती व लिंक साठी WhatsApp क्रमांक- ८९९९८०९४१६
वर संपर्क करावा.पुढील लिंक सर्वत्र पाठवा लिंक – https://forms.gle/ipAbeLt2V52be1yH9