जळगाव शहरामध्ये आज अनोखी शिवजयंती साजरी, जळगाव शहरातील मनोरुग्ण व भिक्षुकी झाले चकाचक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२२
सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुप तर्फे आज जळगाव शहरात एक आगळावेगळा उपक्रम व एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली. गरीब निराधार बेवारस अशा मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजून जिवंत आहे हे समाजसेवक सुमित पंडित यांनी आज दाखवुन दिले.
आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्यातर्फे सकाळी ०९ वाजेपासून पासून रेल्वे स्टेशन, बसस्थानक परीसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक व शासकीय रुग्णालय या परिसरात असणाऱ्या बेवारस निराधारांना शोधून एकत्र करत त्यांची दाढी, कटिंग त्यांची आंघोळ करून नवीन कपडे देत ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ हे वाक्य सिध्द करुन दाखवले.
जे भिक्षुकी रस्त्यावर अत्यंत खराब कपड्यात, डोक्यावर जटा व बऱ्याच दिवसापासून अंघोळ न केलेल्या अश्या निराधारांना माणूस बनवण्याचे कार्य सुमीतभाऊ माणुसकी समुहाने आज केले आहे. हे कार्य राज्यभरात निरंतर सुरु आहे. निराधार व बेवारस फिरणाऱ्यांंना पुन्हा समाजात परत आणण्यासाठी हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवला जात आहे.
सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून सुमित पंडित व त्यांचे सहकारी हे सेवाभावी कार्य करत आहेत. गेल्या दहा ते बारा वर्षापासून ही सेवा दिली जात आहे. यावर्षी जळगाव येथे सेवा देण्यात आली. या कार्यामध्ये इतरांनी सहभाग घ्यावा असे आव्हान माणुसकी समुहातर्फे सुमीत पंडीत यांनी केले आहे. बेवारस निराधारांना माणुसकी ग्रुपने मदतीचा हात दिला आहे हे कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे. महाराष्ट्रमध्ये आतापर्यंत हजारो मनोरुग्णांना येरवडा कारागृह पुणे येथे नेउन त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे.
दुनिया मे आकर कमाया हिरे क्या मोती आखीर कफन को जेब नही होती. अशी भावना सुमित पंडित यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच या कार्यात इतरांनीही सहभाग नोंदवावा, बेवारस निराधारांना पैसे देणे बंद करावे, त्यांचे घर शोधून त्यांना नातेवाईकांकडे सोपवणे गरजेचे आहे. यासोबतच त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही खरी मानव सेवा आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थापक सुमित पंडित, माणुसकी समुहाचे जिल्हा अध्यक्ष गजानन क्षीरसागर, जळगाव शहर व परिसरातील माणुसकी समूहाचे सदस्य धीरज भदाणे, विनोद सपकाळे,मयूर पाटील, प्रशांत महाजन.अमित खैरनार, कमलाकर माळी. चेतन पाटील.निलेश कोळी हे उपस्थित होते. व यांनी मोलाचे सहकार्य केले.
➖➖➖➖➖
प्रतिक्रिया…..
महाराष्ट्रातील बेवारस निराधार अवस्थेत फिरणाऱ्या भिकाऱ्याला दहा रुपये भीक देणे बंद करा. यांचे घर कुठे चुकले त्याच्या घरी पोहचवा. त्यांना कामाला लावा त्यांच्या घरी नेऊन त्यांना आई-वडील आहेत का विचारपूस चौकशी करून त्यांच्या घरच्यांकडे स्वाधीन करा त्यांची दाढी कटिंग स्वच्छ आंघोळ करून त्यांना कामाला लावा हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालू झालेला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र मध्ये हजारोपेक्षा जास्त बेवारस निराधारांना माणुसकी ग्रुप न्याय दिलेला आहे. आणि जो पर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे जसे की दूनिया मे आकर कमाया खूप हिरे क्या मोती मगर कफन को जेब नही होती हे वाक्य मतीतार्थ समजुन हा अवलीया समाजातील रजल्या गाजल्याची सेवा करतोय यातुन आनंद मिळतोय आणी तो जगण्यासाठी पुरेसा आहे अस वाक्य साध्य ठरताना दिसते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा या उक्तीप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आपले कार्य करत आहे.
सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समुह संस्थापक. सुमित पंडित.