शिवसेनेत प्रवेशानंतर श्री. सागरजी ओतारी यांचे मनोगत.
*मी सागर काशिनाथ ओतारी, सर्वात आधी सर्वांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र 🙏*
*जनसेवेचा ध्यास मनाशी बाळगून “अन्यायाच्या विरोधात तरुणाईचा झंझावात” या ब्रीदवाक्याने शेकडो मनाने तरुण असलेल्या युवकांना सोबत घेऊन काही वर्षांपूर्वी मी युवाशक्ती संघटनेची स्थापना केली. आमच्या कार्याची दखल घेऊन हजारो कार्यकर्ते आमच्याशी जोडले गेले व आमच्या सोबत संघटनेचे काम हाती घेऊन जनसेवा करू लागले. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर सर्वच क्षेत्रात युवाशक्ती संघटनेने भरीव कार्य चोपड्यात केले. पोलीस बांधवांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस चौकी देणे असो किंवा आजी माजी सैनिक यांचा “सन्मान शौर्याचा” या माध्यमातून केलेला सन्मान असो, गरीब गरजू विद्यार्थ्यांना दिलेला मदतीचा हात असो किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील जोरदार उपक्रम असोत, समाजातील गरीब बांधवांना वैद्यकीय कामांत लावलेला हातभार असो किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणेसाठी उठवलेला आवाज असो अश्या अनेक उपक्रमांनी युवाशक्ती संघटनेने समाजाप्रती असलेले आपले योगदान दाखवून दिले आहे. रेशन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज तसेच अनेक योजनांबाबत गरीबाच्या तोंडातील घास हिरावणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना कशा प्रकारे अद्दल घडवली आहे ते संपूर्ण चोपडा तालुक्यातील जनतेने गेल्या काही दिवस आधीच बघितले आहे. खरोखर अन्यायाचा बिमोड करण्यासाठी युवकांचे संगठन किती महत्वाचे असते हे आपल्या कार्यातून युवाशक्तीने वेळोवेळी सिद्ध करून दिलेले आहे. आपल्या सर्वांच्या सोबतीने युवाशक्ती संघटनेच्या माध्यमातून अविरत जनसेवा सुरुच राहील.*
*अश्यातच जनसेवेसाठी माझ्या बाहूंना अधिक बळ देण्यासाठी जणूकाही देवानेच योग जुळवून आणला व मी माझ्यासोबत शेकडो कार्यकर्ते घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे आम्हाला अधिक बळ मिळाले असुन जास्तीत जास्त जनसेवा करण्याची शक्ती आमच्या हातांना मिळाली आहे. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य अद्वितीय आहे. साहेबांच्या कार्याने प्रेरित होऊन व आ. सौ. लताताई सोनवणे, मा.आ. अण्णासो श्री. चंद्रकांतजी सोनवणे यांची विकासाची गंगा बघून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढे संपुर्ण चोपड्याच्या जनतेच्या सेवेसाठी शिवसेना, युवासेनेच्या शाखा वाढवून असंख्य युवा वर्ग सोबत घेऊन जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आ. सौ. लताताई सोनवणे, मा.आ.अण्णासो श्री.चंद्रकांतजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने यापुढे चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोकाभिमुख कामे आम्ही करू. पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकींमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकेल व संपूर्ण चोपडा तालुकाच आता भगवामय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो.*
*समस्त शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी तसेच समस्त शिवसैनिक यांनी मला पक्षात स्विकारून, सगळीकडून माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो व आपणास ग्वाही देतो की मी आपल्या विश्वासास नक्की पात्र ठरेल.*
*🚩जय हिंद जय महाराष्ट्र🚩*