केंद्र सरकारने लादलेल्या काळ्या कायद्याचा अंबे वडगाव येथे निषेध.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२०
काल दिनांक ८ डिसेंबर मंगळवार रोजी पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे ग्रामस्थांनी बसस्थानक परिसरात जमून शेतकरी विरुध्द केंद्र शासनाने लादलेल्या अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ सह्याची मोहीम राबवून केंद्र शासनाने केलेल्या कायद्या विरुध्द जोरदार घोषणा देत निषेध नोंदवला. नंतर तहसील कार्यालय पाचोरा येथे जाऊन सदर कायद्याचे निषेध करुन सदर कायदा त्वरीत मागे घेण्याची मागणी केलेले निवेदन पाचोराचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
या प्रसंगी अंबे वडगाव येथील कायदेतज्ज्ञ मंगेश गायकवाड, सुनील वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, संतोष वाघ, ज्ञानेश्वर वाघ,सुनील निकम, राजेंद्र देवरे, भिका जिभाऊ, मोहन चव्हाण, बाबूराव देवरे, शशिकांत वाघ, भोला शळके, मिलिंद भुसारे, मच्छिंद्र थोरात, रामेश्वर पवार, समाधान पवार व असंख्य शेतकरी बांधव हजर होते.
शेतकरी विरोधात केंद्र सरकारने केलेला काळा कायदा रद्द न झाल्यास यापुढे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.