आम्ही मारल्यासारखे करु, तुम्ही रडल्यासारखे करा. वरखेडी येथील राज ढाब्यावर दारुबंदी अधिकाऱ्याचा छुपा आर्शिवाद,
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०९/२०२३
वरखेडी येथील एका ढाब्यावर देशी, विदेशी व गावठी दारुची रात्रंदिवस राजरोसपणे अवैध विक्री, एम . पी. डी. ए. अंतर्गत कारवाईची मागणी. https://satyajeetnews.com/22836/
सत्यजित न्यूज कडून काल वरखेडी येथील राज ढाब्यावर राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध दारु विक्री या विषयावर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला ट्रेन लायू न्यूज कडून समर्थन देण्यात आले होते. याची दखल घेऊन दारुबंदी अधिकारी मा. विलासराव पाटील यांनी संबंधित राज ढाब्यावर धाड टाकली होती. परंतु संबंधित राज ढाब्यावर काहीही आढळून आले नसल्याचा खुलासा संबंधित दारुबंदी अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांना दिला होता.
परंतु आज पुन्हा राज ढाब्यावर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारु विक्री सुरु असून याठिकाणी दारुड्यांची यात्राच भरली आहे. तसेच जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित राज ढाब्याचे मालक व दारुबंदी करण्यासाठी जबाबदार असलेले अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे असून जेव्हा, जेव्हा दारुबंदी करण्यासाठी जनमानसातून किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाज उठवला जातो तेव्हा, तेव्हा संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी संबंधित दारु विक्री करणाऱ्या ढाबा मालकाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन आम्ही कारवाई करण्यासाठी येत आहोत अशी पुर्व सुचना देऊन नंतर धाडसत्र राबवल्याचा देखावा निर्माण करतात अशी माहिती समोर येत असल्याने संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनीचा सी. डी. आर. काढण्यात यावा म्हणजे खरे काय ते समोर येईल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
म्हणून अवैध धंदे करणारे व जबाबदार अधिकारी व कर्मचारी हे जनतेला मुर्ख बनवण्यासाठी आम्ही मारल्यासारखे करु, तुम्ही रडल्यासारखे करा असा खेळ खेळुन सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळ खेळत असून स्वताच्या फायद्यासाठी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत असे दिसून येते.