वडगाव आंबे येथील उघड्यावर मांस विक्री करणाऱ्याला ग्रामपंचायतीकडून नोटीस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०९/२०२३
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथे उघड्यावर मास विक्री होत असल्याने ती तात्काळ थांबवावी यासाठी मा. जिल्हाधिकारी जळगाव, मा. प्रांताधिकारी पाचोरा यांच्याकडे गावातील ग्रामस्थांनी तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप फुलचंद जैन मु. पो. वडगाव आंबे ता. पाचोरा यांच्याकडून पत्र देण्यात आले आहे. तसेच दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी वडगाव आंबे ग्रामपंचायवर कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी मा. धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली होती या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व दिलीप जैन यांनी उघड्यावर सुरु असलेली मांस विक्री थांबवण्याबाबत अर्ज दिला होता.
या ग्रामसभेत दिलेल्या विनंती अर्जाची दखल घेत प्रशासकीय अधिकारी मा. धस साहेबांनी तातडीने दखल घेऊन संबंधित मांस विक्रेत्याला नोटीस बजावली असून उघड्यावर मांस विक्री करु नये अशी सूचना दिली आहे. तसेच संबंधित मांस विक्रेत्याला समज देण्यासाठी एक प्रत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला पाठवणार असल्याची माहिती मा. धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.