वावडदे गावात श्रावणमास निमित्त मांस मच्छी विक्री बंदी करावी ग्रामस्थांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०९/२०२३
जळगाव येथून जवळच असलेल्या वावडदे गावातील चौफुलीवर मांस, मच्छीची खुलेआम विक्री केली असल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत कारण हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा व्रत, उपासना व आराधना करण्याचा महिना असल्याने या महिन्यात विविध धार्मिक सण येतात म्हणून या महिन्यात वावडदे गावातील चौफुलीवर उघड्यावर सुरु मांस व मासे विक्री त्वरित थांबवावी अशी मागणी केली जात आहे.
परंतु या ग्रामस्थांच्या मागणीकडे गावातील पदाधिकारी तसेच स्थानिक अधिकारी व पोलीस पाटील हे जाणून, बुजून दुर्लक्ष करत असल्याने ही उघड्यावर मांस व मासे विक्री सुरु असल्याचा आरोप वावडदे गावातील सुज्ञ नागरिकांनी केला असून ही उघड्यावर होणारी मांंस व मासे विक्री त्वरित थांबवावी म्हणून दुरक्षेत्र पोलीस चौकी म्हसावद यांच्याकडे वारंवार मागणी करुनही संबंधित पोलीस काहीएक कारवाई करत नसल्याने वावडदे गावातील सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली करत येत्या दोन दिवसात वावडदे गावातील चौफुलीवर उघड्यावर सुरु असलेली मांस व मासे विक्री त्वरित न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वावडदे ग्रामस्थांनी दिला आहे.