राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा, पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामस्थांकडून जाहीर निषेध.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०३/२०२२
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे रामदास हे शिवरायांचे गुरू होते व रामदास नसते तर शिवरायांना कोणीच ओळखले नसते असे तसेच शिक्षणमहर्षी महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या बद्दल संतापजनक विधान केल्याने शिवप्रेमीमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक विधानाच्या निषेधार्थ पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थ व शिवप्रेमी संघटनानी निषेध करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरक दिले जाणार नाही, असा इशू निवेदनाव्दारे पाचोरा प्रांताधिकारी यांचेकडे दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्वराज्याची संकल्पना ही राष्ट्रमाता जिजाऊ व राजे शहाजी यांनी मांडली. शिवरायांनी ती संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. त्यासाठी त्यांना त्यांचे आई वडील दोघांचेही मार्गदर्शन लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू ह्या राष्ट्रमाता जिजाऊ या त्यांच्या आईच होत्या. तसेच त्यांच्यावर संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या विचारांचाही प्रभाव होता. त्या अर्थाने तुकाराम महाराज सुद्धा त्यांचे गुरू आहेत. यात रामदास स्वामी कुठेच नसतांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे आपली गरळ ओकली. रामदास हे शिवरायांचे गुरू होते, रामदास नसते तर शिवरायांना कोणीच ओळखले नसते’ असे संतापजनक विधान त्यांनी केले. वास्तविक छत्रपती शिवराय व रामदास यांची आयुष्यात कधीही भेट झालेली नाही. असे ऐतिहासिक पुरावे आहेत. हे न्यायालयाने मान्य केले आहे.
असे असतांनाही राज्यपाल मुद्दामहून महाराजांचा अवमान करत आहेत. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही, असा इशारा पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थ व शिवप्रेमी संघटनांनी निवेदनाव्दारे पाचोरा प्रांताधिकारी यांचेकडे दिला असून तिव्र निषेध व्यक्त केला असून या निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्री, मा.जिल्हाधिकारी व इतर वरीष्ठ अधिकारी यांना पाठवले असून या निवेदनावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शालिग्राम मालकर, संतोष पाटील, जमील तडवी, उदय पाटील, योगेश पाटील, विजय काळे व असंख्य शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.