पाचोरा येथे समता सैनिक दलाची आढावा बैठक संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२३
समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक आयु. किशोर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पाचोरा, भडगाव, पारोळा, सोयगाव तालुक्यातील प्रमुख प्रचारकांच्या उपस्थितीत पाचोरा येथे दिनांक १६ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या आढावा बैठकीत १० डिसेंबर रोजी झालेल्या समता सैनिक दलाच्या तीन दलांचे ऐतिहासिक एकत्रिकरण व संघटनेच्या घडामोडीं संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक तालुक्यात व गावात गणवेशधारी सैनिक निर्माण करणे “गाव तेथे शाखा घर तेथे सैनिक” अभियान राबवणे, समता सैनिक दल मजबूतीसाठी निधी उभारणे, रोजगार, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, शासकिय कर्ज योजना, प्रबोधन, मेळावे रॅली इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात अली. तसेच नविन प्रचारकांना एक महिन्याच्या आत ३०० खेड्यात पोहचण्याचे आभियान व सोबत पाचोरा, भडगाव, पारोळा, सोयगाव तालुक्यातील गावांची जबाबदारी देण्यात आली. तसेच १ जानेवारी २०२४ रोजी शौर्य दिनानिमित्ताने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मानवंदना देण्याचे निश्चित करण्यात आले. अशा अनेक विषयावर या बैठकी चर्चा करुन नियोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत समता सैनिक दलाचे प्रमुख तालुका प्रचारक
आयु. शांताराम सपकाळे (पाचोरा), आयु. विजय मोरे (भडगाव), शरद पवार (सोयगाव), अरुण खरे(लोहारा), जनार्दन जावरे (बात्सर), पिटू सावळे(गोराडखेडा), दशरथ तांबे (शिंदाड), रामजी जावरे(बात्सर), देवानंद साबळे (शिंदाड), वाल्मीक मोरे(पिचर्डॆ), राहुल साठे (खडकदेवळा), राहुल गायकवाड (खडकदेवळा), आनंद सुरवाडे (लोहारा), विश्वनाथ आहिरे (गोराडखेडा), अरुण गायकवाड (खडकदेवळा), मच्छिंद्र खैरनार (वडजी), कल्याण मोरे (वडजी), राकेश मोरे (पिचर्डॆ), आदेश जाधव(लोहारा), वाल्मीक पवार (कोळगाव), अजय सोनवणे (शिंदाड), निलेश सपकाळे (चिंचपुरे) , कैलास सोनवणे (मोंढाळे), अदि तालुक्यातील प्रचारक उपस्थित होते. या आढावा बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व गणवेशधारी सैनिकांनी गणवेश घालून उपस्थित होते.