वरखेडी येथे बसस्थानक परिसरात पी.जे.बचाव कृती समिती तर्फे धरणे आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०१/२०२२
इंग्रजांच्या राजवटीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाचोरा ते जामनेर (गरिबांची गीतांजली) म्हणून ओळख असलेली रेल्वे बंद करण्याचा घाट सुरू असल्याने आज वरखेडी बसस्थानक परिसरात पी.जे.बचाव कृती समिती तर्फे सकाळी ११ ते ५ यावेळात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
शांततेच्या मार्गाने वरखेडी चे माजी सरपंच डिगंबर पाटील,धनराज विसपुते,भोकरीचे सरपंच अरमान अब्दूल,उपसरपंच असलम रुस्तम, वरखेडी ग्रा.पं.सदस्य संजय लक्ष्मण,ज्ञानेश्वर खोंडे, सावखेडा खुर्द चे शिवाजी परदेशी,विरसिंग परदेशी,दिनेश सुधीरसिंग,गणेश रूपचंद परदेशी,सागर पाटील,गोकुळ पाटील,नितीन पाटील,जिभाऊ परदेशी,गफ्फार मुसा,मुक्तार रहेमान,वरखेडीचे धनराज रघुनाथ,चंद्रकांत सोनवणे,राकेश पाटील,संजय देवानंद,राजेश्वर कुलकर्णी, अकिल मौलाना,शे.आसिफ हाजी अब्दूल हमीद,शोएब नाराजी, हारून मुसा,चिंचपुरे येथील सुनिल पाटील,भोजे हिरालाल जाधव,ओमप्रकाश पाटील,लासुरे माजी सरपंच भैय्यासाहेब देवरे, सांडू बाजीराव,चंद्रशेखर निकुंभ,माणिक पाटील,प्रशांत महाजन,सुरेश हिम्मत,महेश भोई,चंद्रकांत जाधव व परिसरातील पाचोरा-जामनेर (पी.जे.) रेल्वेने प्रवास करणारे असंख्य प्रवासी यांचा या धरणे आंदोलनात सहभाग होता.
यावेळी पिंपळगाव हरे. पो.स्टे.चे सहाय्यक फौजदार विजय माळी हे बंदोबस्तासाठी हजर होते.