४० हजारांच्या मुद्देमालासह चोरीला गेलेली स्कुटर शोधून मुळ मालकाला केली परत, पाचोरा पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२३
शहरातील आठवडे बाजार भागातून अज्ञात चोरट्याने स्कुटर व डिक्कीत ठेवलेले ४० हजार रुपये चोरुन नेल्याची घटना दि. १८ जुन रोजी घडली होती. घटना घडल्यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना योग्य त्या सुचना देत पोलीस कॉन्स्टेबल विश्वासराव देशमुख व पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्याकडे या गुन्ह्याची जबाबदारी सोपवली होती. पोलीस कॉन्स्टेबल विश्वासराव देशमुख यांनी पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनीही शिताफीने शोध घेत गुन्ह्यातील चोरीला गेलेली स्कुटर एम. एच. २० सी. के. ०२८५ व स्कुटरच्या डइक्कईत ठेवलेले ४००००/०० रुपये शोधून काढले या त्यांच्या कामगिरीबद्दल पाचोरा शहरातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षा होत आहे. कारण असे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचारी असल्यास नक्कीच सगळीकडे होणाऱ्या चोऱ्या थांबतील असे मत सुज्ञ व जाणकार नागरिकांनी व्यक्त केले आहेत.
चोरीला गेलेली स्कुटर व रोख रक्कम ४००००/०० रुपयांचा शोध लागल्यानंतर दिनांक २४ जून २०२३ शनिवार रोजी संबंधित तक्रारदार म्हणजे स्कुटरचे मुळ मालकाला बोलावून घेत पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेब यांच्या हस्ते मुळ मालकाला परत केले याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक मा. श्री. योगेश गणगे, राहुल मोरे, पोलिस कॉन्स्टेबल विश्वासराव देशमुख, विनोद पाटील, योगेश पाटील, नरेंद्र शिंदे उपस्थित होते. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख व योगेश पाटील यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.