युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी जितेंद्र जैन यांची नियुक्ती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०४/२०२२
युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते तथा मेडिकल व्यावसायिक जितेंद्र जैन यांचे वर सोपवण्यात आली असून नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे. सदरचे नियुक्तीपत्र आ. किशोर आप्पा पाटील यांनी त्यांना समारंभ पूर्वक प्रदान केले. यावेळी याप्रसंगी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या ‘शिवालय’संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे गटनेते रावसाहेब पाटील, रमेश बाफना, डॉ. भरत पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, यांचे सह विशाल राजपूत व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
या निवडीबद्दल जितेंद्र जैन यांनी आगामी काळात आपण युवा संघटनेला अधिक व्यापक चेहरा देणार असल्याचे सांगत पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारी बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. जितेंद्र जैन यांनी पुढे म्हटले आहे की, स्व. बाबासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या सुचने नुसार तसेच युवा सेना सचिव वरून देसाई, विस्तारक कुणाल दराडे, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील यांच्या सह पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संघटना वाढीसाठी काम करणार असून पक्षाची व ठाकरे सरकारचे लोकाभिमुख निर्णयांचा अधिकाअधिक जनतेला फायदा मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे.