राखीव वन, जंगलामध्ये सिमेंट बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवण्यात यावे, भडगाव महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०६/२०२३
सद्यस्थितीत वन, जंगलाकडे शासनाने कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याने या वन, जंगलातील वनसंपत्ती झपाट्याने कमी होत चालली आहे. तसेच या वन, जंगलातील नद्या, नाल्यांची खोली दिवसेंदिवस कमी होत चालली असून पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी वाहून जात असल्याने जंगलातील जलसाठा नष्ट होत असतो. यामुळे पावसाळा संपल्यानंतर थोड्याच दिवसात जंगलातील प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वन, वन भटकावे लागते तसेच हिरवळ नष्ट होऊन चाऱ्याचा तुटवडा भासतो म्हणून आपली तहान, भुख भागवण्यासाठी हे जंगलातील प्राणी शेत शिवार व मानव वस्तीकडे धाव घेतात यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर व पाळीव प्राण्यांची शिकार करुन आपली गरज भागवतात अशातच एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो.
म्हणून वन, जंगलातील नद्या, नाल्यांचे खोलीकरण करुन त्याच्यावर सिमेंट बांध, नाला बांध बांधण्यात यावेत तसेच शक्य होईल तेथे तलाव निर्मिती करुन या राखीव जंगलासह वनांमध्ये शिताफळ, चिंच, उंबर, रामफळ, तेल्या बाभुळ, निंब, वड, पिंपळ, आमटी जोधंळी, आडुळसा, आभटा, बोर, सोंधड, जामुन, मोह, खईट, बेल, बिबा, भिलावा, येड्या बाभुळ अशा जातीची तसेच औषधी वनस्पतींची झाडे लावून व सदर झांडाचे संगोपन केल्यास या झाडांची फळे व पाला जंगलातील बरेचशे प्राण्याचा आहार म्हणुन उपयोगात येऊ शकतो तसेच अडवलेल्या पाण्यावर जंगली प्राण्यांची तहान भागल्यास जंगलातील हिंस्र प्राणी मानव वस्ती कडे येणार नाहीत असे मत भडगाव महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे व्यक्त केले करत शासनाने आमच्या मागणीकडे त्वरित लक्ष देऊन त्वरित बंधारे बांधून पाणी अडवून जंगलातील प्राण्यांची समस्या दुर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे नमूद केले असून निवेदनावर सर्व पदाधिकाऱ्यांनी सह्याचे निवेदन संबंधित अधिकारी व मंत्रालयात पाठले आहेत.
कारण मागील वर्षी वन, जंगलातील वनसंपदा झपाट्याने नष्ट होत असल्याने जंगलातील वन्य प्राणी पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधात वस्तीकडे येत असल्याने कजगाव ता. भडगाव येथील १० शेळ्या व १२ मेंढया वन प्राण्यांनी ठार मारल्या तर घुसर्डी बु।।, ता. पाचोरा येथील बाबुराव पिरा खैरनार यांच्या १५ ते २० शेळ्या मेंढ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे गरीब शेतकन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पुरावे दिले आहेत.