पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी गोवंश हत्या करुन मांंस विक्री करणारांना रंगेहाथ पकडले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मदिना, मदिना मर्कस मशीद समोर कसाईवाड्यात रहात असलेले ईसा शेख मणी व साबीर सलिम कुरेशी हे गोवंशाची हत्या करुन मांंस विक्री करत असल्याबाबतची गोपनीय माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री. महेंद्र वाघमारे यांना मिळाली होती. म्हणून मिळालेल्या माहितीची खात्री करुन घेण्यासाठी त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल संजय मोरे यांना घटनास्थळी जाऊन शहानिशा करण्यासाठी आदेश दिले होते.
या आदेशानुसार संजय मोरे यांनी सकाळी ८.१५ वाजता पोलिस कॉन्स्टेबल संदीप राजपूत यांना सोबत घेत वाहन चालक पोलिस कॉन्स्टेबल सचिन वाघ सह सरकारी वाहनाने मदिना, मदिना मर्कस मशीद समोरील कसाईवाड्यात जाऊन खात्री केली असता ईसा शेख मणी वय (५१) वर्षे व साबीर सलिम कुरेशी वय (२५) वर्षे हे गोवंश हत्या करुन त्याचे मांंस ताब्यात ठेवून त्याची विक्री करतांना आढळून आले.
याबाबत त्यांना विचारपूस केली असता व पोलिसांना पाहून त्यांची भंबेरी उडाली व ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने ते गोवंशाची हत्या करुन मांंस विक्री करत असल्याची खात्री झाल्याने ईसा मणी व साबीर कुरेशी यांना मांंस विक्री करतांना रंगेहाथ आढळून आल्यामुळे त्यांना ते विकत असलेल्या गोमांसासह ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणून पोलिस कॉन्स्टेबल संजु शिवराम मोरे यांच्या फिर्यादीवरून दोघा विरोधात विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ कलम ५ (सी) व ९ (ऐ) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी श्री. गोविंद महाराज मंदिर श्री. त्रिविक्रम महाराज मंदिर व अन्य इतिहास कालीन धर्मस्थळे आहेत. म्हणून पिंपळगाव हरेश्वर गावाची ओळख जळगाव जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर असे ओळखले जाते. व याच गावात असा प्रकार घडणे ही मोठी खेदाची बाब आहे असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.