कुऱ्हाड येथील सुधीर पाटील यांनी कुत्र्यांच्या हल्ल्यातून पाडसाला वाचवले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शिक्षक सुधीर पाटील हे काल सकाळी कुऱ्हाड शिवारातील त्यांच्या शेताकडे फेरफटका मारायला गेले असता रस्त्याजवळील एका छोट्या नाल्यामधे एका हरणाच्या (पिल्लू) पाडसाच्या मागे पाच ते सहा कुत्रे धाऊन हल्ला चढवतांना दिसून आले. या हल्ल्यातून बचावासाठी पाडस जीवापाड प्रयत्न करत होते मात्र कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने पाडस एका झुडपात जाऊन बसले तरीही हे मोकाट कुत्री पाडसाचा पिच्छा सोडत नसल्याचे पाहून सुधीर पाटील यांनी धाव घेत कुत्र्यांना हाकलून लावले व पाडसाला तेथून जंगलाकडे हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडस जखमी झाल्यामुळे त्याला चालणे अशक्य झाल्याचे लक्षात आले.
ही परिस्थिती पाहून सुधीर पाटील यांनी त्या जखमी अवस्थेतील पाडसाला शेतातील गुरांच्या गोठ्यात नेऊन त्याला पाणी पाजून हिरवा चारा टाकला थोड्याच वेळात पाडस शांत झाल्यावर सुधीर पाटील यांनी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला व हकीकत सांगितली तेव्हा पाचोरा विभागाचे यांनी त्यांच्या कर्मच्याऱ्याला पाठवून पाडसाला सुखरुपपणे जंगलात सोडले जर का सुधीर पाटील यांनी तातडीने त्या पाडसाला वाचवले नसते तर ते कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झाले असते हे मात्र नक्की होते.
+पुढील भागात राखीव जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करणारी ढोळी व वनविभागाचे अक्षम दुर्लक्ष या बद्दल सविस्तर वृत्त)
हरणांची शिकार करणारा तो सलमान कोन ?