अंबे वडगाव येथे कापूस खरेदीचा शुभारंभ प्रसंगी ७१००/०० रुपये भावाने खरेदी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथे खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला, या शुभारंभप्रसंगी प्रतिक्विंटल ७१००/०० रुपयांप्रमाणे भाव देऊन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
आंबे वडगाव येथील संजय प्रभाकर देवरे या खाजगी कापूस व्यापारी यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला याप्रसंगी कैलास शिंदे यांच्या हस्ते अल्पभूधारक शेतकरी ज्योतीराम सिताराम कांबळे यांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते काटा पूजन, हर्षल वाघ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. नंतर अमोल वाघ यांच्या हस्ते कापूस तुला करुन कापूस खरेदीला सुरुवात करतात आली.
कापूस खरेदीच्या शुभारंभाच्या वेळी रोहिदास मराठे, पितांबर सपकाळे, संजय देवरे, विनोद देवरे, मोहन टेलर,कडू मराठे (महाजन) अमोल वाघ, समाधान वाघ, हर्षल वाघ, सागर शिंदे, पवन वाघ, वाल्मिक देवरे,राजेंद्र देवरे,वसंतभाऊ पवार, हिरासिंग चव्हाण, मिलिंद भुसारे आदी शेतकरी उपस्थित होते.
तसेच नाना लोटू पाटील यांनीही कापूस खरेदीचा शुभारंभ केला आहे.