महाराष्ट्र राज्य माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशनच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी वरखेडी येथील कु. चेतना हिरे यांची नियुक्ती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०५/२०२३
वरखेडी येथील कु. चेतना रणदीप हीरे ही सर्वसाधारण कुटुंबातील असून तिला आधीपासूनच समाजसेवेचा छंद आहे. कु. चेतना हिरे हिने आजपर्यंत शैक्षणिक जीवनात चांगल्याप्रकारे शिक्षण घेत सोबतच वकृत्व स्पर्धा, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक, पर्यावरण जागृती, सामाजिक कार्यक्रम यात भाग घेऊन बरीचसे समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत.
या कामाची दखल घेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विवेकजी राजापुरे यांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील कु. चेतना हिरे हिची माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशनच्या पाचोरा तालुका महिलादक्षपदी नुकतीच नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल कु. चेतना हिरे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कु. चेतना हिरे.
माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तालुकाध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी मा. श्री. विवेकजी राजापुरे यांचे आभार मानते तसेच माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशनच्या माध्यमातून मी महिला सक्षमीकरण, महिला आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणाविषयी जनजागृती, वृक्षलागवड, सामाजिक विकासात्मक तसेच देश हिताच्या कार्यात नेहमी सदैव अग्रेसर राहून सामाजिक एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहून मा. श्री. विवेकजी राजापुरे यांनी सोपवलेली जबाबदारी पार पडीन असे मत व्यक्त केले. तसेच माझ्या या यशामागे माझे आईवडील आणि शिक्षिका संगीत सुर्यवंशी व स्वाती पाटील यांचा मोलाचा वाटा असल्याचे कु. चेतना हिरे हिने सांगितले.