जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेत श्री.गो.से.हायस्कूलचे यश.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
प्रमोद पाटील.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२३
अखिल भारतीय मराठा सेवा संघ व महात्मा फुले शिक्षक परिषद पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव वकृत्व स्पर्धेत आपल्या शाळेतील इयत्ता नववी (क) ची विद्यार्थिनी कु. कोमल महाजन हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. वेदिका चौधरी व प्रणवी पाटील या विद्यार्थिनींना स्पर्धेत सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. आपल्या शाळेतील विज्ञान शिक्षक अनिल पाटील यांचा जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे कृतिशील शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.
अनिल पाटील व कोमल महाजन यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ,उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील,पर्यवेक्षक आर एल पाटील, ए बी अहिरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी अभिनंदन केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.