भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वडगांव कडे येथील संदिप पाटील यांची नियुक्ती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२२
भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा तालुका अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून वडगाव कडे येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांच्या आदेशान्वये तालुकाध्यक्ष मा. अमोलभाऊ शिंदे यांनी संदिप पाटील यांना भाजपा अटल कार्यालयात निवडीचे नियुक्ती पत्र प्रदान केले.
तसेच आगामी काळांत आध्यात्मिक क्षेत्रात नवनवीन सामाजिक उपक्रम तथा पक्ष वाढीसाठी अमोल भाऊ शिंदे यांनी संदीप पाटील यांना शुभेच्छा दिल्या या वेळी, तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांचे समवेत तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, प्रज्ञावंत आघाडीचे सुनिल पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस प्रदिप पाटील उपस्थीत होते.