कुऱ्हाड येथे दिनांक ३ सप्टेंबर रविवार रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०८/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुन्हाड खुर्द येथील अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व डॉ. शरद देशमुख यांचे मेडिलिव्ह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (द्वारका, नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात अनेक तज्ञ डॉक्टर्स डॉ. अनुज नेहेते (मेंदू विकार), डॉ. स्वप्नील विधाते (नेत्ररोग व मोतीबिंदू), डॉ. राहुल गहिलोद ( अस्थिरोग), डॉ. पार्थ देवगावकर (किडनी विकार), डॉ. दिपीका मुंदडा (एम.डी.), (हृदयरोग), डॉ. अंकुर डॉ. विजय जाधव (बालरोग) डॉ. निखिल पाटील झंवर, (एम. डी), नीलेश पवार (बालरोग), डॉ. शरद देशमुख ( पोटविकार व यकृत), डॉ. सुरज चौधरी (संधिवात), डॉ. महेंद्र बोरसे, (बालरोग), डॉ. सुचिता देशमुख ( स्त्रीरोग तज्ञ), डॉ मुकेश चौधरी (कॅन्सर तज्ञ), डॉ सिद्धांत तेली (एमडी), डॉ. शीतल सावनेरकर (त्वचारोग), डॉ. ज्योत्स्ना पाटील (दंतरोग), रेवती पुजारी (आहार तज्ञ) रुग्णांची विनामूल्य तपासणी करणार आहेत.
या शिबिरात ईसीजी, बीएमडी, लिव्हर फायब्रोस्कॅन, बीएमआय, ब्लड प्रेशर, डायबेटीक न्यूरोपॅथी स्क्रीनिंग, शुगर , लिव्हर फंक्शन टेस्ट, युरिक अॅसिड, हिपॅटायटिस बी व सी तपासणी, हिमोग्लोबीन आदी तपासण्याही मोफत करण्यात येणार असून गरजू रुग्णांनी नांव नोंदणीसाठी ८०८०८८३०७४, ९८८१४१४१३९ किंवा ०२५३/२५०६५९९ या क्रमांकावर साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरास कुऱ्हाड ग्रामपंचायत, विकास सोसायटी, आदर्श हायस्कूल, स्थानिक डॉक्टर्स, कृष्णा लॅब तसेच कुन्हाड ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहीती यकृत विकार तज्ञ डॉ. शरद देशमुख आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुचिता देशमुख यांनी दिली आहे. या शिबीरात गरजू रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महत्वपुर्ण महागड्या चाचण्याचे शिबीर पंचक्रोशित प्रथमच होत आहे. गरजु रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी असून हे शिबिर कुन्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात रविवार ३ सप्टेंबरला होत आहे. या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन पोट व लिव्हर तज्ञ डॉ. शरद ०२५३-२५०६५९९ या नंबर संपर्क देशमुख यांनी केले.