जळगाव जिल्ह्याचे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी मतदान करून तरुणांना केले मतदानासाठी प्रोत्साहित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०१/२०२१
जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होते. म्हणून
माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हा अध्यक्ष तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी आज आपल्या जन्मगावी म्हणजे पाळधी तालुका जामनेर येथे जाऊन आपले बहुमूल्य मतदान करण्याचा अधिकार त्याठिकाणी आज पार पाडला. पाळधी व लोहारा येथे जाऊन माणुसकी ग्रुप सदस्य व सर्व तरुणांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. व गावाचा विकास करणाऱ्या , पाणी स्वच्छता या गंभीर विषयांकडे नेहमी तरुण आणि लक्ष ठेवावे कारण मतदार हा जागृत असला पाहिजे व तरुणांनी आपले हक्क आपल्या अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पाळधी माणुसकी ग्रुपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी परफेक्ट टेलर, गोपाल वाणी, सिताराम वाणी, मुरलीधर वाणी, सुभाष पाटील, विष्णू पाटील, विलास परदेशी, रतन परदेशी, आदी गावातील नागरिक व माणुसकी ग्रुप सदस्य हजर होते. पाळधी गावाचे नाव महाराष्ट्रात गजानन क्षीरसागर यांच्या कार्यामुळे नावलौकीक होत आहे. त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.