कोळगावचे माजी सरपंच कै.सुकदेव सुपडू पाटील यांच्या घरी खासदार उन्मेश दादा पाटील यांची सांत्वन भेट.

दिलीप जैन.( पाचोरा )
कोळगावचे माजी सरपंच कै.सुकदेव सुपडू पाटील यांच्या घरी खासदार उन्मेश दादा पाटील यांची सांत्वन भेट.
————-
कै.तात्यांच्या स्मृतींना दिला उजाळा
————–
कोळगाव — येथील सामाजिक कार्यकर्ते गुणवंतराव पाटील यांचे वडील तथा माजी सरपंच तात्यासाहेब स्व. सुखदेव सुपडु पाटील यांचे नुकतेच निधन झाले. आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कोळगाव येथे स्व. सुखदेव सुपडु पाटील यांच्या घरी सांत्वन भेट दिली. याप्रसंगी चाळीसगाव पंचायत समितीचे प्रभारी सभापती सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य कै.ची. बापू पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन, गिरीशभाऊ ब-हाटे उपस्थित होते यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गुणवंत पाटील व श्रीमती मालनबाई पाटील यांचे सांत्वन करीत तात्यासाहेब कै.सुखदेव पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी दगडू नाना पाटील, श्याम पाटील सर, बी एन पाटील सर ,नाना पवार ,गुलाबराव महाजन आदी उपस्थित होते.