भोकरी येथे विद्यार्थी ग्रुप तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२२/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी येथील जिल्हापरिषद उर्दू शाळेत भोकरी येथील विद्यार्थी ग्रुप तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी सेवा लॅब पाचोराचे पॉथालॉजीस्ट गुलफाम शेख, अरबाज काकर, तनवीर काकर यांनी मोफत सेवा दिली.
या शिबिरासाठी विद्यार्थी ग्रुपचे अध्यक्ष असलम काकर, उपाध्यक्ष अफसर काकर, सचिव सलिम काकर, खजिनदार मोहसीन काकर, सल्लागार डॉ. मोहसीन काकर, सरचिटणीस अर्शद हलवाई, सदस्य मोसिन इसा, शोएब काकर, अरबाज काकर, सरफराज काकर, इरफान किकर, अनसार काकर, शोयब, अशफाक काकर, शरीर पठाण, असिफ हकीम, फहिम काकर, सईद काकर, मोहसीन काकर, अरबाज काकर, मोसिन मोहम्मद, मोसिन मुक्तार यांनी विशेष परिश्रम घेतले. या रक्तगट तपासणी शिबिरात दोनशे लोकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सुरवातीला सेवा लाभ पाचोराचे मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला होता.