नगरदेवळा येथील ५८ वर्षीय इसमाचा मधमाश्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०३/२०२३
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील एका ५८ वर्षीय इसमाचा मधमाश्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सय्यद सबदर सय्यद इस्माईल व त्यांचा मुलगा सय्यद अबित सबदर हे दोघ हातमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. नियमितपणे ते आजही नगरदेवळा येथून जवळच असलेल्या शिंदोळे शिवारत रोजंदारीवर शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम आटोपून दुपारी चार वाजेच्या सुमारास ते घराकडे निघाले असता शिंदोळे गावाजवळ आल्यावर या दोघ बाप, लेकांवर मधमाश्यांनी अचानकपणे जोरदार हल्ला चढवला हा हल्ला अनपेक्षित न नकळत झाल्यामुळे सय्यद सबदर व सय्यद अबिद हे मधमाश्यांच्या हल्ल्यापासून स्वताचा बचाव करु शकले नाहीत.
या हल्ल्यात सय्यद सबदर याच्या तोंडावर जोरदार हल्ला चढवल्यामुळे सबदर हा जागेवरच कोसळला तर त्याचा मुलगा अबिदही गंभीर जखमी झाला होता. ही वार्ता गाव परिसरात माहीत पडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु उशीर झाला होता. या मधमाश्यांच्या हल्ल्यात सय्यद सबदर याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मुलगा अबिद हा जबर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने पाचोरा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून डॉ. स्वप्नील दादा पाटील हे उपचार करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या मधमाश्या आगे मोहळच्या असल्याने सय्यद सबदर याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
हे सय्यद कुटुंब भूमिहीन शेतमजूर असून मयत सय्यद सबदर याच्या पाश्चात पत्नी, दोन मुले व तीन मुली असा परिवार असल्याने व हा अपघाती मृत्यू असल्याने या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या सय्यद परिवाराला त्वरित शासकीय मदत मिळावी अशी मागणी नगरदेवळा व शिंदोळे गावातून केली जात आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावागावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.