पिंपळगाव हरेश्र्वर गावातील गुटखा विक्रेत्यांकडून हप्ते घेणारा तो कोण ? गावभर खमंग चर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२२
काल दिनांक ०५ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी पिंपळगाव हरेश्र्वर सह पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार व मागणीनुसार सत्यजित न्यूज कडून पिंपळगाव हरेश्र्वर येथील गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी हे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. हे वृत्त सत्यजित न्यूजच्या पोर्टलवर झळकताच पिंपळगाव हरेश्र्वर सह आसपासच्या दह्या खेडेगावातील गावागावातून सुज्ञ नागरिका व सर्वसामान्य जनतेतून सत्यजित न्यूजकडे भ्रमणध्वनीवर संपर्क साधून खरोखरच संपूर्ण गुटखाबंदी झाली पाहिजे अशी मागणी करत सत्यजित न्यूजचे आभार मानले होते.
पिंपळगाव हरेश्र्वर येथील गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी.
तर दुसरीकडे अवैधपणे गुटखा विक्री करणारांच्या पायाखालची वाळू सरकली असून पानटपरी, किराणा दुकान, उपहारगृहाचे मालक किरकोळ विक्रेत्यांनी पाचोरा, पिंपळगाव हरेश्र्वर व वरसाडे तांडा येथील ठोक (होलसेल) गुटखा विक्रेत्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सत्यजित न्यूजने लावलेल्या बातमीची लिंक पाठवून सद्यस्थितीत आमच्याकडे गुटखा पाठवू नका असा संदेश दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तसेच या गुटखा विक्री करणारांची पाठराखण करणारा व दरमहा ५००/०० ते १२००/०० रुपये हप्ते जमा करणाऱ्या एका खाजगी एजंटला संबंधित अवैध गुटखा विक्री करणारांनी धारेवर धरले असून तुम्हाला आम्ही नियमितपणे हप्ते देत आहोत तरीही आमचा व्यवसाय बंद झाला आहे. व आता आमच्यावर कारवाई होईल की नाही हे माहीत नसले तरी तुम्ही आमच्याकडून घेतलेले या महिन्याचे हप्त्याचे पैसे परत करा असा तगादा लावल्यामुळे गुटखा विक्रेते व हप्ते जमा करणारा खाजगी एजंट यांच्यात तु, तु, मै, मै झाल्याची खमंग चर्चा पिंपळगाव हरेश्र्वर गावात होत असून हा हप्ते जमा करणारा खाजगी एजंट कोण ? तो कुणाच्या सांगण्यावरून व कुणासाठी हप्ते जमा करत होता ? हा प्रश्न गुलदस्त्यात असलातरी मात्र याबाबत पिंपळगाव हरेश्र्वर गावासह आसपासच्या दहा खेड्यापाड्यातील जनतेतून याबाबत कुतुहल निर्माण झाले असून कायमस्वरूपी गुटखा बंदी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.