पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांना पाचोरा पोलीसांतर्फे आवाहन
*पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांना पाचोरा पोलीसांतर्फे आवाहन करण्यात येते की,
१) सध्या दीपावली चा सण सुरू होत आहे त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे, दागिने ठेऊन जाऊ नका||
२) दिपावळी किंवा लग्न समारंभ करिता बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तु, पैसे बँकेत किंवा सोबत घेऊन जावे।।
३) आपण बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना तसेच पोलीसांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी||
४) बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये||
५) प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ पिउ नयेत..त्यामध्ये गुंगीचे औषध असू शकते||
६) प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध रहावे||
७) गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे||
८) व्यापारी, दुकानदार, सराफा यांनीही याकाळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, CCTV कॅमेरे लावावेत||
९) बाजारामध्ये खरेदी करताना मोबाईल किंवा पैसे वरच्या खिशात ठेऊ नये तसेच आपली गाडी व्यवस्थीत ठिकाणी पार्क करून हँडल लॉक करून ठेवावी।।
१०) ऑनलाईन फ्रॉड च्या आमिषाला बळी पडू नये||
११) परिसरामध्ये किंवा आपल्या कॉलनी मध्ये काही संशयीत हालचाली, संशयीत इसम किंवा काही अनुचित प्रकार आढळल्यास किंवा दिसल्यास *पोलीस स्टेशन पाचोरा०२५९६/२४०१३३ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा।।
*जनहितार्थ*
किसनराव नजन पाटील.
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन पाचोरा
ता.पाचोरा जि.जळगाव