वरखेडी येथील गुरांच्या बाजाराजवळ रस्त्यावर वाहनांचा अडथळा,मोठ्या अपघाताची शक्यता
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वरखेडी येथील उपबाजार समितीत प्रत्येक गुरुवारी गुरांचा आठवडे बाजार भरतो.ही बाजार समिती जामनेर रस्त्यावर असल्याने गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजारात महाराष्ट्रभरातुन गुरेढोरे विकण्यासाठी येतात ही गुरे आणतांना मोठ्याप्रमाणात टेम्पो , ट्रक , मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा,बैलगाडी यातून हि गुरे ने आण केली जातात म्हणून मोठ्याप्रमाणात या ठिकाणी वाहने या बाजारात येतात
वरखेडी गुरांच्या बाजारासाठी मोठे मार्केट असून या मार्केट यार्डात वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध असतांनाही वाहनधारक मार्केट कमेटीच्या आवारात वाहने न लावता जामनेर पाचोरा रस्त्यावर रस्त्याच्या दोघ बाजूला उभे करतात कारण गुरांच्या बाजारात मार्केट यार्डात जातांना व बाहेर निघतांना वाहनांची व गुराढोरांची एकच गर्दी होते व धक्का लागल्यावर भांडणे होतात म्हणून वाहन धारक आपली वाहने भररस्त्यात उभी करतात या वाहनांमुळे गुरांच्या बाजारासमोर वाहनांची गर्दी होऊन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना रहदारीस अडथळा येतो.
तसेच जामनेर पाचोरा हा रस्ता जास्त वर्दळीचा रस्ता असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूकीचा खोळंबा होऊन पूर्वीकडे पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालयापर्यंत तर पश्चिमेला लोहारी गावापर्यंत वाहतूक ठप्प होते व छोटी मोठी भांडणे होतात
एखाद्या वेळेस याच वेळात रुग्णवाहिका आल्यास रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी उशीर होतो तर एसटी सेवा खोळंबून तातडीच्या कामासाठी जाण्यासाठी घरुन निघालेल्या गरजूंना उशिरा झाल्याने महत्वाची कामे होत नाहीत व पश्चाताप सहन करावा लागतो.
म्हणून जनतेची गैरसोय टाळण्यासाठी वरखेडी बाजार समितीजवळ जामनेर ,पाचोरा या भररस्त्यात उभ्या वाहनांच्या चालक , मालकावर वाहतूककोंडी करण्यासाठी जबाबदार धरून कारवाई करावी व आपापली वाहने वरखेडी गुरांच्या बाजारासाठी उपलब्ध असलेल्या मार्केट यार्डात उभी करण्यासाठी भाग पाडावे अशी मागणी या रस्त्याने जाणारे वाहनधारक व सुज्ञनागरीकातुन केली जात आहे.
महत्त्वाचे = वरखेडी येथील गुरांच्या उपबाजार समितीचे भलेमोठे ग्राऊंड आहे. दोन प्रवेशद्वार आहेत.परंतु मार्केटकमीटीचे आयोजन ,नियोजन योग्य पध्दतीने केलेजात नसल्याने दोन प्रवेशद्वार असल्यावरही एकच प्रवेशद्वार उघडले जाते व एक कायमस्वरूपी बंदच असते जर दोघ प्रवेशद्वार उघडे ठेवलेतर वाहनांना आत जाण्यायेण्यासाठी अडचणी येणार नाही. तसेच गुराढोरांची मार्केट फी वारंवार वाढवणे कमी करणे अशी मनमानी सुरु असल्याने पशुधन पालक व व्यापारी वर्ग वैतागला असून मार्केट यार्डात पिण्याचे पाणी , शौचालय , मुतारी , शेतकरी निवासात थकून भागून आलेल्या बळीराजासाठी आरामकक्ष असून नसल्यासारखे आहे. येथे कोणत्याही सुविधा उपलब्ध नसून इमारतीची साफसफाई होत नसल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व सध्या प्रशासकीय राजवट असल्याने कोणालाही कुणाचे देणेघेणे नाही अशी परिस्थिती दिसून येते )
तरी लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष देऊन जामनेर ,पाचोरा रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी व मार्केटमध्ये सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.