तरुणीवर सामूहिक बलात्कारासह विष पाजल्याचा नातेवाईकांचा आरोप पोलिसात गुन्हा दाखल .
दिलीप जैन.(पाचोरा)
आजच्या परिस्थितीत महिला सुरक्षित नाहीत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही कारण महीलांची छेडखानी , बलात्कार , खून , सासरच्या जाचास कंटाळून महिलेची आत्महत्या अशी प्रकरणे दररोज घडत आहेत
अशीच एक घटना
जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील एका वीस वर्षाच्या तरूणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार नंतर तिला विष पाजून ठार केल्याचा आरोप नातेवाईकां तर्फे करण्यात आला आहे या घटनेतील तरुणीचा मृत्यू झाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी पा रोळा येथील एक तरुणी बेपत्ता झाली होती . त्यामुळे तिची मिसिंग दाखल करण्यात आली परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती बेशुद्ध अवस्थेत पारोळा बस स्टँड परिसरात नातेवाईकांना आढळून आली .नातेवाईकांनी वैद्यकीय उपचारार्थ तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल केले तिच्यावर उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला दरम्यान तिच्यावर सामूहिक बलात्कार व नंतर तिला विष पाजून ठार केल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस स्टेशनला धाव घेतली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पिडीत मृताचे नातेवाईक गुन्हा दाखल कामी पारोळा पोलिस स्टेशन येथे हजर होते. दरम्यान या घटनेने पारोळा परिसरात एकच खळबळ माजली असून मृताच्या नातेवाइकांनी संशयितांना किंवा दोषी असतील त्यांना ताब्यात घेऊन योग्य ते शासन करावे अशी मागणी पारोळा पोलीस स्टेशन येथे केली आहे. यावेळी पारोळा परिसरात मोठ्या प्रमाणात मृताचे नातेवाईक व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .