पाचोरा तालुक्यातील सार्वे(पिंप्री) गाव बनले समस्यांचे माहेरघर
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथून जवळच असलेल्या सार्वे (पिंप्री) हे २००० लोकसंख्या असलेले छोटेसे गाव येथील ग्रामपंचायतीवर ९ सदस्य परंतु ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने या ठिकाणी काही महिन्यापासून प्रशासकीय राजवट सुरु झाली व तेव्हापासून गावात अनेक समस्यां निर्माण झाल्या असून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गावात ठिकठिकाणी सांडपाणी साचले असून डबके तयार झाले आहेत. तसेच या डबक्याजवळ गवत उगवले असून गावात दुर्गंधी व डासांची संख्या वाढल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
तसे प्रशासकीय राजवट सुरु झाल्यापासून ग्रामसेवक ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडवत नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विषेश म्हणजे या ग्रामसेवकाच्या बदलीसाठी अर्जाव्दारे मागणी केली असल्यावर सुध्दा या मनमानी करणाऱ्या ग्रामसेवकाची बदली होत नसून सतत आठ वर्षापासून एकच ग्रामपंचायतीवर नियुक्त असल्याचे समजते
(सविस्तर वृत्त बुधवार दिनांक गावात जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गाव एक समस्या अनेक ही मालिका सत्यजित न्यूज लवकरच सुरु करणार आहे)