ईव्हीएम मशीनवर बटनाचे जागी पांढऱ्या कागदावर निवडणूक चिन्हे पुसट व लहान आकाराची असल्याने मतदात्यांची उडाली भंबेरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०१/२०२१
जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दिनांक १५ जानेवारी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. परंतु मतदान करतांना मतदात्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले अशी माहीती गावागावातील ग्रामस्थांनी आपपल्या गावातील सुज्ञनागरीक व उमेदवारांना देत नाराजी व्यक्त केली आहे.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की दिनांक १५ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या मतदानाच्यावेळी मतदान करण्यासाठी ग्रामस्थ व महिला मतदान केंद्रावर गेल्या असता ईव्हीएम मशिनजवळ गेल्यावर खुपच मनस्ताप होत होता
कारण ईव्हीएम मशिनजवळ गेल्यानंतर मतदान करण्यासाठीच्या बटणाजवळ अपेक्षित चिन्हावर मतदान करण्यासाठी गेले असता अपेक्षित चिन्हे ही पांढऱ्या कागदावर लहान आकारात व पुसट असल्याने ती व्यवस्थित दिसत नव्हती म्हणून मतदान करायचे तरी कसे या विवंचनेत मतदार गोंधळात पडले कारण जेष्ट नागरीकांना व महिलांना तसेच नव्यानेच मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांचा खुपच गोंधळ उडाला.
तसेच मतदान करणारांची गर्दी असल्याने व आपण ही समस्या कुणाजवळ सांगावी हे माहिती नसल्याने तसेच बऱ्याच उमेदवारांनी प्रचाराचे वेळेस ईव्हीएम मशीन सोबत घेऊन प्रात्यक्षिक न दाखवता तोंडी प्रचार केल्याने तोंडी सांगितल्याप्रमाणे नेमके मतदान करायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाल्याने कोणतेही चिन्ह न पहाताच कुठे तिनवेळा तर कुठे दोनवेळा बटन दाबून उमेदवारांचा गैरसमज होवूनये म्हणून आपली जबाबदारी पार पाडली
परंतु या ईव्हीएम मशिनवरील पांढऱ्या कागदावरील लहान आकारातील पुसट चिन्हे न समजल्याने मतदान करतांना अपेक्षित उमेदवाराला मतदान करता आले नाही अशी खंत मतदात्यांनी व्यक्त केली आहे.