गरुड महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस साजरा.
योगिता चौधरी.(शेंदुर्णी)
दिनांक~१४/०८/२०२३
आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथे विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवसाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करुन जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉ. सुजाता पाटील यांनी “आदिवासी संस्कृती आणि विकास” या विषयावर सखोल माहिती दिली यात आदिवासी समाजाचा इतिहास, त्यांचे जीवनमान, त्यांच्या संस्कृतीत असलेल्या महत्त्वपूर्ण बाबी, त्यांचे निसर्गावर असलेले प्रेम आणि सामाजिक भाव या गोष्टींवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक मा. श्री. श्याम साळुंखे हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याची पार्श्वभूमी आणि आवश्यकता याबाबतीत मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाने केलेली प्रगती आणि त्यांच्या उत्कर्षासाठी समाजाचा सहभाग या विषयावर सुद्धा चर्चा केली. महाविद्यालयात क्रांती दिनाचे औचित्य साधून भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. अजिनाथ जिवरग यांचे “भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात क्रांतिकारकांचे योगदान” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
क्रांतीदिन, क्रांतीदिनाच्या मागील इतिहास आणि आजच्या तरुणाला या इतिहास ज्ञानाची असलेली आवश्यकता असा तिहेरी संगम साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगिता चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.