आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्या कोल्हे ते पिंपळगाव हरेश्र्वर रस्त्यावर असलेल्या खटकाळ नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२२

कोल्हे ते पिंपळगाव हरेश्र्वर दरम्यानच्या रस्त्यावर खटकाळ नदीवर असलेला जुना फर्शी पुल निकामी झाल्याने तसेच बहुळा नदीचा उगम अंजिंठा डोंगरातून असल्याने थोडासाही पाऊस झाला तरी बहूळा नदीला पुर येऊन कोल्हे ते पिंपळगाव हरेश्र्वर दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या पुलावरुन पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने कोल्हे, अटलगव्हान, मोराड, माळेगाव पिंप्री तसेच शेंदुर्णी परिसरातील गावातील ग्रामस्थांना तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडथळा निर्माण होत होता तर कधी, कधी अत्यावश्यक कामासाठी जीवावर खेळून डोक्याबरोबर पाण्यातून पिंपळगाव हरेश्र्वर येथे जावे लागत होते.

ही समस्या लक्षात घेऊन कोल्हे, अटलगव्हान, मोराड, माळेगाव पिंप्री तसेच पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामस्थांनी तसेच कोल्हे येथील प्रगतिशील शेतकरी मा. श्री. रमेशचंद्रजी बाळ्या यांनी कोल्हे गावी मा. श्री. अरविंद सावंत साहेब आले असतांना स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्याकडे या पुलाची मागणी केली होती व सत्य परिस्थीती लक्षात यावी म्हणून मा. श्री. अरविंद सावंत साहेबांना मुद्दामहून त्याच रस्त्यावरून कोल्हे गावी आणून या ठिकाणी पुल बांधण्याची किती गरज आहे हे लक्षात आणून दिले होते.

याचीच दखल घेत आता पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्याकडे बहूळा नदीवर उंच पुल बांधुन देण्यासाठी तगादा लावला होता. याची दखल घेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नातून नाबार्ड योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हे ते पिंपळगाव हरेश्र्वर दरम्यानच्या बहूळा नदीवर पुलासाठी मंजूरी मिळवून दिली असून या पुलाचे भूमिपूजन उद्या दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ सोमवार रोजी सकाळी ठिक दहा वाजता पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी हजर रहावे असे आवाहन बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या