वृंदावन हॉस्पिटल व वाक ग्रामपंचायतीचे संयुक्त विद्यमाने उद्या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२२
भडगाव तालुक्यातील वाक ग्रामपंचायतीचे सरपंच तथा पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांनी वाक ग्रामपंचायत व वृंदावन हॉस्पिटलचे माध्यमातून तरुणांना रोजगार मिळावा याकरिता १० वी, १२ वी, आय. टी. आय, डिप्लोमा, (सर्व ट्रेड), बि. ए. बी, कॉम, बी. एस. सी. पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण (ट्रेनी) म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यासाठी उद्या दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ सोमवार रोजी वाक ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
हा रोजगार मेळावा दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ सोमवार रोजी वाक येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून सुरु होणार असून या रोजगार मेळाव्याचे ठिकाणी येणाऱ्या इच्छुकांनी सर्व शैक्षणिक सर्टिफिकेट (प्रमाणपत्र, दाखले), पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक पासबुक, दोन पासपोर्ट फोटो घेऊन हजर रहावे असे आवाहन डॉ. निळकंठ पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी केले असून जास्तीत, जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.