स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री.गो.से.हायस्कूल येथे व्याख्यानाचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०८/२०२२
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे जागर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा या कार्यक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ मॅडम ध्येय न्यूज तथा अकॅडमीचे संचालक श्री. संदीपजी महाजन व निवृत्त पर्यवेक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. शांतारामजी चौधरी सर यांनी व्याख्यान दिले यावेळी पाचोरा गावाचा इतिहास श्री संदीप जी महाजन यांनी सांगितला.
स्वातंत्र्यसैनिकांचे लढ्यातील योगदान सांगताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तसेच स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगताना श्री. शांतारामजी चौधरी यांनी १८८५ ते १९४७ पर्यंत घडलेल्या विविध ऐतिहासिक घटनांचा आधार घेत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ मॅडम यांनी स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक आणि लोकनेते यांच्या विषयी माहिती सांगितली.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री आर .एल. पाटील श्री. एन .आर. ठाकरे श्री. ए .बी .अहिरे तसेच किमान कौशल्य विभागाचे प्रमुख श्री. बाविस्कर सर तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री. एस. एन .पाटील सर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री. आर .बी. तडवी सर सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. एम.आर. पाटील यांनी केले तर आभार डी. डी. कुमावत सर यांनी मानले.