पाचोरा येथे मा. श्री. उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी अटल मैदानाची पाहणी करतांना सौ. वैशालीताई सुर्यवंशी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२३
पाचोरा येथे दिनांक २३ एप्रिल रविवार रोजी माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गीय आर.ओ. तात्या पाटील यांच्या पुतळाचे अनावर तसेच निर्मल सिडस मधिल लॅबचे उद्घाटन निमित्ताने पाचोरा येथे येत आहेत. त्या दिवशी त्यांची जाहिर सभा पाचोरा येथील भडगाव रोड परिसरातील अटल मैदानावर होणार असून त्याकरीता उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन दिनांक १६ एप्रिल २०२३ रविवार रोजी अटल मैदानाची पाहणी केली.
यावेळी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करुन सभेत येणाऱ्या जनतेला कोणत्याही प्रकारची तसदी व्हायला नको तसेच जवळच पाचोरा, भडगाव रहदारीचा रस्ता असल्याकारणाने सभेसाठी येणारे श्रोते व त्यांच्या वाहनांना उभे करण्यासाठी वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर सुविधा कश्या पुरवल्या जातील याबाबत सुचना देत पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेतली.
या पाहणीच्या वेळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत व वैशाली सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, रमेश बाफना, उद्धव मराठे, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल दीपक पाटील, अनिल सावंत, जितेंद्र जैन, भुपेश सोमवंशी, राजेंद्र राणा, अभिषेख खंडेलवाल, पप्पु जाधव, हरीश देवरे, गौरव पाटील, फकिरचंद पाटील, दादाभाऊ चौधरी, दत्ता जडे, बबलू भोई, आनंद संघवी, प्रशांत सोनार, जगदीश महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.