पिंपळगाव हरेश्र्वर गावात हप्ते वाढल्यामुळे गुटखा महागला गुटखा विक्रेत्यांचा जाहीर खुलासा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/११/२०२२

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथे भररस्त्यावर, उपहारगृह, पान टपरीवर तसेच लहानमोठ्या किराणा दुकानातून, शाळा, कॉलेजच्या जवळपास शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य मिश्रीत पदार्थांच्या गुटख्याची दिवसाढवळ्या खुलेआम विक्री होत असल्याने अल्पवयीन, तरुण तसेच सर्व वयोगटातील पुरूष व महिला या गुटख्याच्या आहारी जात असल्याने पिंपळगाव हरेश्र्वर गावातून सुज्ञ नागरिक, काही समाजसेवक व समाजसुधारकांनी प्रसारमाध्यमांकडे खंत व्यक्त करत पिंपळगाव हरेश्र्वर गावांसहीत तालुक्यातील सुरु असलेली गुटखा विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साकडे घातले होते.

याची दखल घेऊन

गुटखाबंदी असतांनाही पाचोरा शहरासह तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री, कारवाईची मागणी.

पिंपळगाव हरेश्र्वर गावातील गुटखा विक्रेत्यांकडून हप्ते घेणारा तो कोण ? गावभर खमंग चर्चा.

या शीर्षकाखाली सत्यजितच्या माध्यमातून गुटखा बंदी व्हावी म्हणून वृत प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच पाचोरा शहरातील एक नावाजलेला गुटखा किंग व पिंपळगाव हरेश्र्वर येथील गुटख्याचा ठोक विक्रेता तसेच किरकोळ विक्रेत्यांनी संबंधित बातमीबाबत पत्रकारांवर मनसोक्तपणे तोंडसुख घेतले तर दुसरीकडे काही हप्तेखोर, कायद्याच्या रक्षकांनी गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई न करता आलेल्या बातमीचे भांडवल करत गुटखा विक्रेत्यांकडून हप्ते वाढवून घेतल्याचे खात्रीलायक वृत्त गुटखा विक्रेते व जनमानसातील चर्चेतून खुलेपणाने ऐकायला मिळत असल्याने सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याचेच जिवंत उदाहरण म्हणजे पिंपळगाव हरेश्र्वर गावातील गुटखा विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी हप्त्याची वाढलेली रक्कम वसुल करण्यासाठी नामी शक्कल लढवून १०/०० रुपयाला मिळणारी गुटख्याची पुडी १२/०० रुपये व २०/०० रुपयात मिळणारी गुटख्याची पुडी २५/०० रुपयात विक्री सुरु केल्यामुळे गुटखा शौकीनांनी नाराजी व्यक्त करत आधीच्याच दरामध्ये गुटखा पुडी द्यावी असा हट्ट धरला असता ग्राहक व गुटखा विक्रेते ज्याच्या त्याच्या निर्णयावर व मागणीवर ठाम असल्याने संबंधित गुटखा विक्रेते व गुटखा खाण्याऱ्या (शौकीन) खवय्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन वादविवाद झाल्याची खमंग चर्चा पिंपळगाव हरेश्र्वर गावात सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासन तसेच गुटखाबंदी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी नावालाच~
एका बाजूला जळगाव जिल्ह्यासह पाचोरा शहरात व तालुक्यातील खेड्यापाड्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात खुलेआम, दिवसाढवळ्या विक्री होत असल्याने सुज्ञ नागरिक व सर्वसामान्य जनतेतून संपूर्ण गुटखाबंदी करण्यासाठी जोरदार मागणी केली जात असतांनाच संबंधित अधिकारी व कर्मचारी हे झोपेचे सोंग घेऊन कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याने गुटखा विक्री करणाऱ्यांकडून संबंधित अधिकारी व कर्मचारी खरच हप्ते घेत असतीलच असा संशय जनतेतून व्यक्त केला जात असून याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनी ची माहिती (सी.डी.आर.) काढून सखोल चौकशी होऊन हप्ते घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व कायमस्वरूपी गुटखाबंदी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रेकिंग बातम्या