दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/११/२०२२

म्हणतात ना भगवान के घर देर हे अंधेर नहीं याचीच प्रचिती ठाकरे गटाचे जेष्ठ नेते मा. श्री. संजयजी राऊत यांच्या बाबतीत आली आहे. कारण गेल्या १०० दिवसापासून कोठडीत असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

गेल्या १०० दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ पुन्हा बाहेर येत आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून दिली जात आहे. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर येऊन पुन्हा धडाडणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे.

गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी व त्यानंतर दोनदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली होती. त्यामुळे आज राऊत यांना जामीन मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार अखेर आज राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याची लहर निर्माण झाली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी न्यायदेवतेचे आभार मानले आहेत. तसेच ठिकठिकाणी चौकाचौकात फटक्यांची आतिषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला आहे.