वरखेडी बॅंकेत चोरीचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी व अट्टल घरफोड्याला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत व डॉ. प्रितेष संकलेचा यांच्या घरी दिनांक ११ शनिवार रोजी सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास चोर चोरीचा प्रयत्न करत असतांनाच वरखेडी येथील सागर अशोक चौधरी यांच्या प्रसंगावधानामुळे व त्याने हिंमतीने चोरट्यांशी दोन हात करत चोरट्यांना पळवून लावले होते यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व पुढील अनर्थ टळला होता.
मात्र चोर पळून जातांना स्वताचा बचाव करण्याच्या नादात चोरी करण्यासाठी सोबत आणलेले साहित्य लोखंडी टामी हातोडा व थोड्याच अंतरावर स्वयंचलित दुचाकी नंबर एम. एच. १९ / टी. १८०८ सोडून चोरटा पसार झाला होता. हा चोरीचा प्रकार लक्षात येताच योगेश चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांना भ्रमणध्वनीवर घडलेला प्रकार सांगितला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून उपस्थीतांकडून परिस्थिती जाणून घेत तपासकामी पुढील कारवाई सुरू केली होती हा तपास सुरू असतांनाच
जळगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात वाढते घरफोडीचे प्रमाण लक्षात घेता जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडेसाहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना शोध घेवून योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते.
त्यावरुन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण अरुण पाटील, पोलीस नाईक किशोर ममराज राठोड, पोलीस नाईक रणजीत अशोक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुभाष पाटील अश्यांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले सदर पथकास गुप्त खबऱ्या मार्फत बातमी मिळाल्या नंतर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस भाग ०५ गुन्हा रजिस्टर नंबर १४८/२०२२ भादवी क. ४५७,३८०.५११ या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी वर नमुद पोलीस पथक खाजगी वाहनाने पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे गेले होते.
वरखेडी येथे आल्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्रने लावलेल्या सी. सी. टी. व्ही. फुटेजच्या आधारे सदर फुटेज मधील संशयीत ईसम हा जामनेर तालुक्यातील कासली येथील रहीवाशी असल्याची खात्री झाल्यावरुन सदर पथकाने जामनेर तालुक्यातील कासली गावात जाऊन संशयीत इसमाचा कसून शोध घेतला असता सदर संशयीत हा जुबेर ईकबाल तडवी असुन तो पहुर येथील आठवडा बाजारात गेले असल्याचे समजले.
त्यावरुन सदर पथकाने तत्काळ पहुर गाठून तेथे संशयीत जुबेर इंकबाल तडवी वय २२ राहणार कासली यास ताब्यात घेउन त्यास विश्वासात घेउन विचारपुस केली असता. त्याने पिंपळगाव हरेश्वर येथे दाखल झालेल्या भाग ०५ गु.र.नं. १४८/२०२२ भादवी क. ४५७, ३८०, ५११ या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच जामनेर पोस्टे भाग ०५ गु.र.नं. २४१ / २०२२ भादवी क. ४५७, ३८०, ५११ हा गुन्हा केल्याची देखील कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करुन पुढील कारवाईसाठी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. या कारवाई बाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.