कडे वडगाव येथे अंकुर सीड्स तर्फे मोफत वह्यांचे वाटप.?.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते व अंकुर सीडीचे जिल्हा प्रतिनिधी मा. श्री. राहूल निकम व पाचोरा तालुका प्रतिनिधी मा. श्री. बबलू तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकुर सीडस तर्फे मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी गावाचे सरपंच श्री. मच्छिंद्र तडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील, गावाचे पोलीस पाटील, श्री. सुनील पाटील, माजी सरपंच श्री अतुल पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. गजानन पाटील, पुण्यनगरीचे वार्ताहर श्री. विनोद पाटील, शिक्षणप्रेमी श्री. रवींद्र पाटील उपस्थित होते.
अंकुर सीडस कंपनीच्या माध्यमातून जिल्हाभरात जिल्हापरिषद मराठी शाळेतील मुलांसाठी वह्या वाटप करुन गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना एकप्रकारे प्रोत्साहन देण्यासाठी चांगला उपक्रम राबविणारी अंकुर सीडस ही पहिलीच कंपनी असल्याचे सांगत या उपक्रमाबाबत मा. श्री. मधुकर भाऊ काटे यांनी कंपनीचे आभार मानले.
जिल्हापरिषदेच्या शाळांबाबत सगळीकडे वेगळाच गैरसमज असल्याचे दिसून येते मात्र वास्तव वेगळेच आहे. हे कडे वडगाव येथील जिल्हापरिशदेची शाळा व इतरही बऱ्याच शाळा पाहिल्यावर लक्षात आले. कडे वडगाव येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेला भेट दिल्यानंतर मन भारावून गेले कारण ग्रामीण भागातील शाळा असल्यावर ही या शाळेतील शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी शाळेची इमारत, शाळेचा परिसर, परिसरात वाढवलेली झाडं, झुडप इतर निसर्ग संपदा व रंगरंगोटीच्या माध्यमातून बोलक्या केलेल्या भिंती हे पाहून येथील शिक्षकांचे व ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मनोगत मा. श्री. राहुल निकम यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री. सुरेश सूर्यवंशी श्री. नवल ठोंबरे, श्री. अमरसिंग पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. बी. राठोड यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. परदेशी यांनी उपस्थितांचे व अंकुर सीडस कंपनीचे आभार मानले .