सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा येथील गो.से.हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप.

पाचोरा येथील गो.से.हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप.

By Satyajeet News
July 17, 2021
306
0
Share:
Post Views: 72
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०७/२०२१

एसएससी परीक्षा मार्च २०२०~२१ मध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा शालेय समिती चेअरमन खलील दादा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१) सोनवणे कु दिपाली प्रल्हाद- प्रथम(९९%)
२) न्याती ऋषिकेश राकेश- द्वितीय(९८%)
३) महाजन ललित विकास- तृतीय(९७.४०%)
४) दाभाडे श्रेयश गिरीश- तृतीय(९७.४०%)
५) राठोड योगिता राजाराम- चवथा(९७.२०%)
६)पाटील प्रणव अनिल- पाचवा(९६.६०%)
७) सूर्यवंशी कु प्रियांशू संजय- पाचवा(९६.६०%)

यावर्षीचा दहावीचा रिझल्ट लागला आणि पहिल्यांदाच करोनाच्या कृपेने एका अनोख्या रिझल्टला विद्यार्थी आणि पालक सामोरे जात आहेत. परीक्षा न घेताच फक्त अंतर्गत मूल्यमापनानुसार हा निकाल लावला गेला आहे त्यामुळे या निकालाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.

परिक्षा न घेताच निकाल घोषित झाल्यामुळे या निकालाला काहिसे थट्टेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोविड बॅच, लॉटरी रिझल्ट, मार्कांची खैरात, बिनविरोध पास अशी शेरेबाजी सुरू झाली आहे. त्यामूळे पेढे वगैरे वाटून, कौतुक करण्यासारखे विशेष काहि नाहि अशी कुजकट बोलणी करणारेही काहि महाभाग आहेत. अशावेळी ज्यांनी करोनाच्या या महासंकटात, अत्यंत विपरीत परिस्थितीत, भांबावलेल्या मनस्थितीत, आयुष्यातील एका महत्त्वाच्या परिक्षेचा अगदि जीव तोडून अभ्यास केला आहे अशा विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप तितकीच गरजेची आहे.

       कोरोनाच्या या महाभयंकर संकटाला कशा प्रकारचे नियोजन करावे याचा पुर्वानुभव कोणालाच नव्हता  त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सरकारने हा जो काहि निर्णय शालांत परिक्षेच्या बाबतीत घेतला आहे तो योग्यच म्हणायला हवाय. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अगदि योग्यच आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची जी पद्धती अवलंबली अत्यंत योग्य होती . खऱ्या अर्थाने नववीच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झालं व त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला .त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. कौतूकाचा पेढा त्यांच्या तोंडात भरवलाच पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप कुठेही कमी पडणार नाहि याची काळजी सुद्धा घ्यायलाच पाहिजे. ही परिस्थिती व विद्यार्थ्यांची मनस्थिती लक्षात घेऊ पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप भाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ, संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब व्ही. टी. जोशी, मानद सचिव मा ऍड. महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील दादा देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासाहेब वासुदेव महाजन यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ आयोजित करण्यात आला. व विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.

कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत आपले लक्ष विचलित न होऊ देता यश विद्यार्थ्यांनी संपादन केले त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची खूप खूप अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा खलील दादा देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे प्रतिनिधी दादासाहेब आकाश वाघ, उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ ,पर्यवेक्षक श्री. आर. एल .पाटील ,श्री. एन. आर. ठाकरे, श्री. ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री मनीष बाविस्कर, कार्यालय अधीक्षक श्री अजय सिनकर व दहावीचे वर्ग शिक्षक श्री आर बी बांठिया, श्री डी डी विसपुते, श्री बी एस पाटील उपस्थित व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सापडलेला मोबाईल पो.ना.राकेश खोंडे यांनी केला परत.

Next Article

अज्ञाताने कापूस पिकावर तन नाशक फवारल्याने, अर्धा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    खासदार उन्मेश दादा यांच्या पाठपुराव्याने हिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्गाची अधिकाऱ्यानी केली पाहणी

    November 20, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी राज्यमार्ग दुरूस्ती कामाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व फलक अनावरण.

    October 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    घरी आलेल्या बाळाला पाहताच, अश्रूंची झाली फुले. पाचोरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

    June 6, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    एक दिवस आपल्या छंदासाठी निमीत्ताने पाचोरा येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न.

    January 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात कोरोना विस्फोट,आज तब्बल ९८३ रूग्ण

    March 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    श्री.गो.से.हायस्कूल.पाचोरा येथे स्वराज्य प्रेरक राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

    January 12, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना मनोज जरांगे पाटलांची मूकसंमती.

  • आपलं जळगाव

    मराठा उद्योजक लॉबी पाचोरा यांच्या तर्फे , महारक्तदान शिबिराचे आयोजन. ( रक्तदात्यास वर्षभरासाठी कापड खरेदीवर १५ ते २० टक्के सूट )

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज